Delhi earthquake what to do if you are driving a car during an earthquake: दिल्ली आणि आसपासच्या परिसरात पहाटे झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांची झोप उडाली. या भूकंपाचा पीक पॉइंट (peak point) दिल्ली असल्याचे सांगितले जात आहे; परंतु कमी रिश्तर स्केलमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घराबाहेर पळताना दिसले. अशा परिस्थितीत जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि अचानक भूकंप झाला, तर काय कराल? खरं तर अशा बिकट परिस्थितीत लोकांना काय करावे हे समजत नाही. म्हणूनच आज आपण या लेखातून गाडी चालवताना भूकंप झाला, तर नेमकं काय करायचं हे जाणून घेणार आहोत.

‘या’ ठिकाणी गाडी पार्क करू नका

जर तुम्ही गाडी चालवत असताना अचानक भूकंप झाला, तर सर्वप्रथम तुमची गाडी रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी थांबवा; परंतु लक्षात ठेवा की, तुमची गाडी कधीही पूल, ओव्हरपास किंवा विजेच्या खांबाजवळ पार्क करू नका.

सीट बेल्ट लावा

भूकंपाच्या वेळी तुमच्या वाहनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका. कारण- त्यामुळे पडण्याचा आणि जखमी होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत वाहनाचे दरवाजे व खिडक्या बंद ठेवा आणि सीट बेल्ट लावून बसा.

गाडीचे इंजिन बंद करा

अशा परिस्थितीत वाहनाचे इंजिन बंद करा; जेणेकरून अपघाताचा धोका कमी होईल आणि गरज पडल्यास तुम्हाला ताबडतोब बाहेर पडण्यासाठी वेळ मिळेल.

जास्त वेगाने गाडी चालवू नका

भूकंप झाल्यानंतर लगेचच वेगाने गाडी चालवू नका. प्रथम गाडीतून उतरा आणि रस्त्याची तपासणी करा आणि आजूबाजूच्या वातावरणाकडेही एक नजर टाका.

इकडे-तिकडे पळू नका

जेव्हा भूकंप होतो तेव्हा लोक अनेकदा घाबरतात आणि इकडे-तिकडे पळण्याचा प्रयत्न करतात; परंतु असे केल्याने आजूबाजूचे वातावरण बिघडते आणि लोकांमध्ये चेंगराचेंगरी होऊ शकते.

तेव्हा भूकंप झाल्यावर तुम्ही घरी असाल किंवा गाडी चालवत असाल, तर शांत राहणे नेहमीच शहाणपणाचे असते. अशा परिस्थितीत कधीही मूर्खपणा करू नका आणि इकडे-तिकडे इतस्तत: पळू नका.

Story img Loader