आघाडीची वाहन उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ऑक्टोबर २०२२ मध्ये, ‘Hero Vida’ भारतीय बाजारपेठेत लाँच केली. कंपनीने ही स्कूटर V1 Pro आणि V1 Plus या दोन प्रकारात लाँच केली. कंपनीने Vida V1 Pro ची किंमत १.५९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि V1 Plus ची किंमत १.४५ लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. कंपनीने दोन्ही स्कूटर पोर्टेबल बॅटरीसह लाँच केल्या आहेत. म्हणजेच ग्राहकांना या स्कूटरमधून बॅटरी बाहेर काढून चार्ज करता येते आता, कंपनीने Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hero Vida V1 ‘अशी’ आहे खास

हिरो कंपनीचा दावा आहे की, इलेक्ट्रिक स्कूटरला अनेक उत्कृष्ट फीचर्ससह सादर करण्यात आले आहे. यात टच स्क्रीन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, कीलेस कंट्रोल आणि अॅलॉय व्हील यांसारखे फीचर्स आहेत.Hero Vida V1 या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ८०Kmph आहे. स्कूटरमध्ये ८-इंचाची TFT डॅश टच स्क्रीन वापरण्यात आली आहे. डॅशमध्ये स्मार्टफोन पेअरिंग देण्यात आले आहे.

(हे ही वाचा << बाजारपेठेत धुमाकूळ घालायला येतेय मारुतीची इलेक्ट्रिक SUV; Tata Nexon EV पेक्षाही असेल स्वस्त )

‘या’ शहरांमध्ये ‘Hero Vida V1’ उपलब्ध

कंपनीने Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी बेंगळुरूमध्ये सुरु केली आहे. सुरुवातीला ही ई-स्कूटर बेंगळुरू, जयपूर आणि दिल्ली येथे उपलब्ध करून दिली जाईल. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरण्यात येणारी बॅटरी हीरोनेच विकसित केली आहे. यामुळे बॅटरीचे आयुष्य अधिक असणार आहे. डॅशमध्ये स्मार्टफोन पेअरिंग देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delivery of hero vida v1 e scooter begins range of 143 to 165 km in single charge currently available in these cities pdb
Show comments