Ajit Pawar Car Collection: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या ९ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवार थेट उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या या बंडानंतर आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान असलेले अजित पवार यांच्या ताफ्यात कोणत्या कार आहेत, तुम्हाला माहितेय का? चला तर पाहूया त्यांचे कार कलेक्शन…
अजित पवारांकडे एकापेक्षा एक जबरदस्त कार
अजित पवार यांच्याकडे Honda Accord, Honda CRV, Toyota Camry या कार्स असल्याची माहिती ‘जनसत्ता’ ने दिली आहे. चला तर जाणून घेऊया या कारचे फीचर्स…
- Honda Accord कार दोन मोटर हायब्रीड-इलेक्ट्रिक प्रणालीसह सुसज्ज आहे. हायब्रीड मॉडेलमध्ये नवीन २.०-लिटर अॅटकिन्सन सायकल ४-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हायब्रिडचे एकत्रित सिस्टम आउटपुट २०४ hp आहे आणि पीक टॉर्क ३३५Nm आहे. याशिवाय, LX आणि EX मॉडेल्सना VTEC व्हेरिएबल वाल्व लिफ्ट तंत्रज्ञानासह १.५-लिटर टर्बोचार्ज केलेले ४-सिलेंडर इंजिन मिळेल. हे इंजिन १८९bhp चे जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि २६०Nm टॉर्क निर्माण करते असे म्हटले जाते. या कारची किंमत १३ लाख आहे.
- होंडानं CR-V चं फिफ्थ जनरेशन मॉडल २०१६ मध्ये लॉन्च केलं होतं आणि २०१९ मध्ये यात काही बदल देखील केले होते. CR-V च्या नव्या मॉडलमध्ये नवं केबिन, मोठं बोनट, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि इन्फोटेन्समेंट स्क्रीनसारखे जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत.
- Toyota Camry यामध्ये हायब्रिड पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक पॉवरट्रेन आहे. हे इंजिन २.५ लीटर, ४- सिलेंडर पेट्रोलसकट येते. या इंजिनमध्ये मोटर जनरेटर २१८PS चे आऊटपुट दिले आहे. या कारमध्ये स्पोर्ट, इको आणि नॉर्मल असे तीन प्रकारचे ड्रायव्हिंग मोड आहेत. कॅमरी कारच्या हायब्रिड बॅटरीच्या बाबतीत म्हणायचे झाले तर ही बॅटरी ८ वर्ष किंवा १,६०,०० किलोमीटरच्या गॅरंटीसकट तुम्हाला मिळते.