रस्ते अपघात कमी करण्यासाठी सरकार गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील आहे. सहा एअरबॅग्ज, थ्री पॉइंट बेल्ट या सारख्या बाबी अनिवार्य केल्या आहे. दुसरीकडे, रात्रीच्या वेळी वाहन चालवताना खूप सतर्कतेची आवश्यकता असते. कारण अनेक वेळा लांब पल्ल्याच्या प्रवासात थकवा आल्याने चालकाला झोप येते. त्यामुळे वाहनाचा तोल बिघडून मोठा अपघात होऊ शकतो. काही वेळा हा अपघात जीवघेणा ठरू शकते. आता या समस्येवर नागपूरच्या गौरव सावलाखे याने उपाय शोधला आहे. त्याने बनवलेलं हायटेक उपकरण तुम्हाला ड्रायव्हिंग करताना झोपल्यावर अलर्ट करेल आणि अपघातापासून वाचवेल.

लक्झरी कारमध्ये सुरक्षिततेसाठी अनेक हायटेक उपकरणे आहेत. वाहनाभोवती बसवलेल्या सेन्सर्सवरून आजूबाजूच्या गोष्टींची कल्पना घेऊन कारचा वेग मर्यादित करते. परंतु सामान्य गाड्यांमध्ये असे कोणतेही उपकरण नाही की, जे झोपेच्या वेळी वाहनाचा समतोल राखेल आणि अपघात होत असताना वाहनाचा वेग कमी करेल. मात्र गौरव सावलाखे यांचे हे उपकरण सर्वसामान्य वाहनांना अपघातांपासून वाचवू शकते. गौरवच्या म्हणण्यानुसार, गाडी चालवताना हे उपकरण कानाच्या मागे ठेवावे लागते. हे सेन्सर, ३.६ व्होल्ट बॅटरीसह येते. या डिव्हाइसमध्ये ऑन-ऑफ स्विच आहे. जेव्हा ड्रायव्हरचे डोके स्टीयरिंग व्हीलच्या दिशेने ३० अंश झुकलेले असते, तेव्हा अलार्म डिव्हाइस कंपन करू लागेल आणि तुम्हाला सतर्क करेल. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले डोके ३० अंशाच्या कोनात झुकते आणि डिव्हाइस सक्रिय होते. गौरवने सांगितले की, “एकदा झोपेमुळे कारला अपघात झाला होता. त्यात गंभीर जखमी झालो होतो. त्यानंतर गाडी चालवताना झोप लागल्यावर अलर्ट करण्यासाठी एक उपकरण डिझाइन करण्याची कल्पना सुचली.”

Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित

दुसरीकडे, चंदीगड विद्यापीठाचा विद्यार्थी मोहित यादव याने रोड पल्स सॉफ्टवेअर विकसित केले आहे. जे दारू पिऊन गाडी चालवण्याला प्रतिबंधित करेल. हे सॉफ्टवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करते. चालकाने दारू पिऊन गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला तरी गाडी सुरू होत नाही. तसेच जोपर्यंत ड्रायव्हर त्याच्या कारचा सीट बेल्ट लावत नाही तोपर्यंत कार सुरू होणार नाही. मोहितच्या म्हणण्यानुसार, यासाठी त्याने स्टिअरिंगवर सेन्सर वापरला आहे. ड्रायव्हरच्या शरीरात ०.०८ टक्क्यांहून अधिक अल्कोहोल असेल तर कार सुरू होत नाही.