Dhananjay Munde Car Accident: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारला झालेल्या अपघाताच्या चर्चा अजूनही सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त आलं. या अपघातामध्ये धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली असल्याचंही समोर आलं आहे. मंगळवारी रात्री १२.३०च्या सुमारास परळीमधील आझाद चौकात हा अपघात झाला. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अपघाताबद्दल माहिती दिली. धनंजय मुंडे यांच्या अपघात झालेल्या गाडीचा व्हिडीओ समोर आला.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, धनंजय मुंडे यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. गाडीचं बोनेट पूर्णपणे डॅमेज झालेलं दिसत आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. चक्काचूर झालेली ही गाडी BMW कंपनीची असल्याचे समोर आले आहे. ही लक्झरी कार BMW X7 आहे. या कारनेच धनंजय मुंडेचा अपघात झाला आहे. ही कार आपल्यासाठी किती सुरक्षित आहे, चला तर जाणून घेऊया.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Premachi Goshta Fame Actress Amruta Bane
सासरे असावेत तर असे! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीची सासरेबुवांसाठी खास पोस्ट; अभिनेता पती कमेंट करत म्हणाला…
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
aai kuthe kay karte fame actress kaumudi walokar grahmakh photos viral
लगीनघाई! ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीचा ग्रहमख विधी पार पडला, फोटो आले समोर

BMW X7 कशी आहे ही कार?

BMW X7 ही एक लग्झरी एसयूव्ही आहे. xDrive40i M स्पोर्ट आणि X7 चं टॉप-एंड व्हेरियंट आहे. या कारची किंमत २ कोटीच्या घरात आहे. ही एक्स शोरूममधील किंमत आहे. हे टॉप-एंड मॉडेल ६ एअरबॅग्ज, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, हाय-बीम असिस्ट, सीट बेल्ट वॉर्निंग यांसारख्या सुरक्षा फीचर्ससह येते.

हे ही वाचा << फुल चार्ज केल्यानंतर ३०० किलोमीटरपर्यंतची रेंज देणारी Tata ची ‘ही’ इलेक्ट्रिक कार फक्त ‘इतक्या’ रुपयात

BMW X7 पॉवरफुल इंजिन

या कारमध्ये कंपनीने ३.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन ३४० एचपी पॉवर आणि ४५० न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. तसेच यात दुसऱ्या ३.० लीटर डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. हे इंजिन २६५ एचपी पॉवर आणि ६२० न्युटन मीटर टॉर्क जनरेट करतं.

२४५ किमी प्रतितास इतका वेग

पेट्रोल इंजिनसह या कारचं टॉप स्पीड २४५ किमी प्रति तास इतका आहे. ही कार ६.१ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास इतका वेग धारण करते. डिझेल इंजिनसह ही कार २२७ किमी प्रति तास इतक्या वेगाने धावते. ही कार ७ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास इतका वेग धारण करते. दोन्ही इंजिन ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतात.

Story img Loader