Dhantrayodashi And Diwali Car Discount: येत्या धनत्रयोदशी व दिवाळीच्या मुहूर्तावर जर आपण नवी गाडी घेण्याच्या विचारात असाल तर आपल्यासाठी तीन बेस्ट ऑफर आज आम्ही सांगणार आहोत. भारतीय कुटुंबाची गरज लक्षात घेऊन आपण आज SUVs च्या भन्नाट डील पाहणार आहोत. महिंद्रा व ह्युंदाई या विश्वसनीय कंपनीकडून ग्राहकांसाठी येत्या दिवाळीच्या निमित्ताने आपल्या क्लासिक SUVs वर तब्बल ३ लाखांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. या SUVs वर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्स विषयी सविस्तर माहिती पाहुयात…

महिंद्रा अल्टुरस जी 4 (Mahindra Alturas G4)

दिवाळीच्या निमित्ताने महिंद्रा कंपनीच्या महिंद्रा अल्टुरसच्या खरेदीसह आपल्याला तब्बल ३ लाख रुपये वाचवण्याची संधी मिळत आहे. अल्टुरस जी4 या मॉडेलवर २ लाख २० हजाराचे कॅश डिस्काउंटकंपनीतर्फे देण्यात येणार आहे. तर ग्राहकांना गाडीसह २० हजार रुपये किमतीच्या ऍक्सेसरीजही मोफत देण्यात येतील. प्राप्त माहितीनुसार कंपनीतर्फे ११ हजार ५०० रुपयांचे कॉर्पोरट डिस्काउंटसुद्धा दिले जाणार आहेत. तसेच आपण जर आपली जुनी गाडी बदलून नवी घेऊ इच्छित असाल तर आपल्याला ५ हजाराचा एक्सचेंज बोनस व अतिरिक्त ४४ हजार ५०० रुपयांचे लाभ सुद्धा मिळवता येणार आहेत.

Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?
home prices increase due to gst
नवीन वर्षात घरे महागणार? सरकारच्या नव्या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढण्याची भीती
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?

महिंद्रा स्कोर्पियो क्लासिक (Mahindra Scorpio Classic)

महिंद्रा स्कॉर्पियो क्लासिक ही महिंद्रा कंपनीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. कंपनीतर्फे येत्या सणाच्या निमित्ताने या क्लासिक SUV वर २ लाख ९० हजार रुपये पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. कंपनीतर्फे अलीकडे महिंद्रा स्कॉर्पियो एन ही नवी गाडी लाँच करण्यात आली असून त्यावर मात्र ही सूट लागू नसेल. महिंद्रा स्कॉर्पियो क्लासिकवर १ लाख ७५ हजाराचे कॅश डिस्काउंट तसेच २० हजार रुपयांच्या कार ऍक्सेसरीज देण्यात येणार आहेत. जुन्या गादीवर १० हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस व ४ हजार रुपयांचे कॉर्पोरेट डिस्काउंट सुद्धा आपण मिळवू शकता.

दिवाळीत ७७ रुपयांच्या EMI वर खरेदी करा नवीकोरी Bajaj CT 110X Bike; पहा भन्नाट फीचर व स्वस्त प्लॅन

ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक (Hyundai Kona Electric)

ह्युंदाई कंपनीच्या या इलेक्ट्रिक एसयुव्हीवर ग्राहकांना १ लाख रुपये वाचवण्याची संधी मिळणार आहे. या इलेक्ट्रिक कारवर कंपनी थेट १ लाख रुपयांचे कॅश डिस्काउंट देणार आहे. यामध्ये कोणत्याही एक्स्चेंज बोनस किंवा अन्य ऑफर्स उपलब्ध नसतील. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सध्या ह्युंदाईच्या कारचे रिव्हह्युज उत्तम आहेत.

Story img Loader