मारुती सुझुकी आणि ह्युंदाईनंतर आता महिंद्रा देखील आपल्या काही वाहनांवर मोठी सूट देत असल्याचे समोर आले आहे. काही निवडक महिंद्रा डिलरशीप निवडक वाहनांवर ६२ हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहेत. यामध्ये महिंद्रा एक्सयूव्ही ३००, महिंद्रा मराझो आणि महिंद्रा बोलेरो या वाहनांचा समावेश आहे. मात्र, महिंद्राने स्कॉर्पिओ क्लासिक, स्कॉर्पिओ एन, थार आणि एक्सयूव्ही ७०० यांना सूटमधून वगळले आहे.
१) महिंद्रा एक्सयूव्ही ३००
Mahindra XUV 300 डिझेल वाहनाच्या खरेदीवर तुम्ही २३ हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट मिळवू शकता. तसेच, वाहनावर २५ हजार रुपयांचा एक्सचेंज लाभ मिळत असून, ४ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. यासह तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंतच्या अॅक्सेसरीज मिळू शकतात.
(ब्ल्यू टीक शुल्क, बनावट खाती, इत्यादींमुळे ट्विटर नकोसे वाटतंय? खाते डिलीट करायचे असल्यास ‘हे’ करा)
या वाहनाच्या काही निवडक पेट्रोल व्हेरिएंट्सवर ऑफर आहेत. यामध्ये ग्राहकांना २९ हजार रुपयांपर्यंतच्या कॅश डिस्काउंट व्यतिरिक्त २५ हजार रुपयांचे एक्सचेंज बेनेफिट मिळेल. १० हजार रुपयांच्या अॅक्सेसरजीसह ४ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटही तुम्ही मिळवू शकता.
२) महिंद्रा मराझो
Mahindra marazzo ३५ हजार २०० रुपयांच्या डिस्काउंटसह या महिन्यात मिळेल. डिस्काउंटमध्ये २० हजार रुपयांच्या कॅश डिस्काउंटसह ५ हजार २०० रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि १० हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.
३) महिंद्रा बोलेरो
या महिन्यात तुम्ही Mahindra Bolero २८ हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. डिस्काउंटमध्ये ६ हजार ५०० रुपयांचा कॅश डिस्काउंट, १० हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज डिस्काउंट आणि ३ हजार रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. महिंद्रा अॅक्सेसरीजवर ८ हजार ५०० रुपयांपर्यंतचा ऑफर देत आहे.