Disha patani buys new custom land rover range rover autobiography car: भारतीय चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच चर्चेत असते आणि याचे कारण आहे तिची लग्झरी जीवनशैली आणि तिचे चित्रपट. आता दिशा पुन्हा चर्चेत आली आहे आणि त्याचे कारण आहे तिची नवीन कस्टम लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी एसयूव्ही. अलीकडेच दिशा तिच्या नवीन एसयूव्हीसह दिसली आहे, जी मॅट ब्लॅक रंगाची आहे आणि अभिनेत्रीने तिच्या गरजा आणि प्राधान्यांनुसार ती कस्टमाइज केली आहे. रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी मॉडेल ही भारतातील फिल्म स्टार्सची आवडती एसयूव्ही मानली जाते.
दिशाची दमदार एसयूव्ही
दिशा पाटनीच्या नवीन लक्झरी एसयूव्ही लँड रोलर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफीमध्ये ३.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे, जे माइल्ड हायब्रिड टेक्नॉलजीने सुसज्ज आहे आणि ते इंजिन ३९४ एचपीची कमाल पॉवर आणि ५५० न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज असलेल्या या शक्तिशाली एसयूव्हीमध्ये ४×४ ड्राइव्हट्रेन आहे.
हेही वाचा… एअरबॅगमुळे ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू! लहान मुलांना कारमध्ये बसवण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
अप्रतिम फिचर्स आणि सेफ्टी
दिशा पाटनीची नवीन रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी एसयूव्ही केवळ दिसायलाच आकर्षक नाही, तर तिच्या आलिशान केबिनमध्ये उच्च दर्जाचे मटेरियल्स वापरले गेले आहेत. यात १३.२-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम तसेच एक मोठा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, 4-झोन ऑटोमॅटिक हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एसी सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, व्हॉईस कमांड, डिजिटल ऑडिओ ब्रॉडकास्ट यासह बरेच फिचर्स आहेत. मेरिडियन साउंड सिस्टम, मसाज फंक्शन अशी सर्व वैशिष्ट्ये आहेत, जी कारमध्ये बसलेल्या लोकांच्या सोयी, आराम आणि सुरक्षिततेशी संबंधित आहेत.
दिशा पाटनीची लग्झरी कार्स
दिशा पाटनीच्या नवीन लक्झरी एसयुव्ही लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफीची किंमत ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दिशा पाटनी लक्झरी कारची शौकीन आहे आणि तिच्या गॅरेजमध्ये 2019 मॉडेल रेंज रोव्हर स्पोर्ट एचएसई, मर्सिडीज बेंझ एस4590 आणि बीएमडब्ल्यू 7 सीरीज सारख्या महागड्या कार्स आहेत. आता नवीन लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफीसह, ती मोठ्या फिल्म स्टार्सच्या कॅटेगरीमध्ये सामील झाली आहे ज्यांना रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी अधिक आवडते.