Honda Diwali Sale: होंडाची कार खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असू शकते. होंडाच्या नवीन फेस्टिव्हल ऑफरसह या सणासुदीला जे कार घेण्याचा विचार करत आहेत, त्यांना ही चालून आलेली संधी आहे.

होंडा त्याच्या फ्लॅगशिप, सिटी ई:एचईव्ही हायब्रिडसह संपूर्ण पोर्टफोलिओवर बंपर डील देत आहे. ऑक्टोबरच्या बोनान्झा व्यतिरिक्त, जपानी फोर व्हिलर कंपनी एलिव्हेट पाचव्या जनरेशनची सिटी, अमेझ आणि हायब्रिड सिटीवर इंडस्ट्री- फर्स्ट सात वर्षांची विस्तारित वॉरंटी देत आहे; तरी ग्राहकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की सवलत दर डीलरशिप आणि शहरांनुसार भिन्न असतात आणि कार मॉडेलच्या उपलब्धतेवर आधारित असतात.

Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
celebrations at durgadi fort in kalyan
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…
Nagpur winter session will be held from December 16th to 21st and it will be formality
नागपूर हिवाळी अधिवेशन पाचच दिवसांचे ? वैदर्भीय नाराज

होंडा सिटी (Honda City)

MRP : 12.08 लाख रुपयांपासून, एक्स-शोरूम

सवलत : 1.14 लाखांपर्यंत

अधिकृत Honda Cars वेबसाइटवर आधारित, 5th-gen City 1.14 लाख रुपयांच्या सवलती देत आहे. जर एखाद्याकडे उत्कृष्ट वाटाघाटी कौशल्य असेल तर त्यांना चांगले फायदे मिळू शकतात. सिटी 1.5-लिटर NA पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे आणि 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT सह पेअर केले आहे.

होंडा अमेझ (Honda Amaze)

MRP : 7.20 लाख रुपयांपासून, एक्स-शोरूम

सवलत : 1.12 लाखांपर्यंत

होंडा त्याच्या संपूर्ण अमेझ लाईनअपवर सवलत देत आहे, ज्यात टॉप व्हेरियंट VX आणि VX Elite आहेत, जे रु. १.१२ लाखपर्यंतची मोठी ऑफर देतात. मिड आणि एंट्री-लेव्हल ट्रिम, S आणि E, अनुक्रमे रु. ९२,००० आणि रु. ८२,००० पर्यंतच्या डीलसह येतात. होंडा या कमी किमती देऊ करत आहे, कारण पुढच्या जनरेशनमधील अमेझ लवकरच पदार्पण करणार आहे आणि त्याच्या नेमेसिस, मारुती सुझुकी डीझायरला टक्कर देईल.

होंडा सिटी ई:एचईव्ही (Honda City e:HEV)

MRP: 19 लाख रुपयांपासून सुरू होणारी, एक्स-शोरूम

सवलत: 90,000 रुपयांपर्यंत

होंडाची फ्लॅगशिप गाडी, सीटी हायब्रिड ही 90,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीसह उपलब्ध आहे. व्हेरिएंटच्या आधारावर ही डील वेगवेगळी असेल. City e:HEV 1.5-लिटर, चार-सिलेंडर, ऍटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिन आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे समर्थित आहे. तसेच ही कार ई-सीव्हीटी ट्रान्समिशनसह येते.

होंडा एलिव्हेट (Honda Elevate)

MRP: 11.91 लाख रुपयांपासून, एक्स-शोरूम

सवलत: 75,000 हजारांपर्यंत

होंडा एलिव्हेट, 75,000 रुपयांपर्यंत सवलतीसह उपलब्ध आहे. Honda ने अलीकडेच Elevate Apex Edition लाँच केली आहे, जी फीचर्सने परिपूर्ण आहे आणि त्याची किंमत १२.८६ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. स्टँडर्ड आणि एपेक्स एडिशन दोन्ही 1.5-लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहेत आणि मॅन्युअल आणि CVT दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत.

दिवाळी सेल: सात वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी (Diwali Sale: 7-year extended warranty)

होंडाने इंडस्ट्री-फर्स्ट एक्स्टेंडेड वॉरंटी प्रोग्राम सादर केला आहे, जो सात वर्षांपर्यंत अमर्यादित किलोमीटर कव्हरेज ऑफर करतो. ही एक्स्टेंडेड वॉरंटी Elevate, City, City e:HEV आणि Amaze वर दिली आहे. शिवाय जर ग्राहकाने पूर्वी एक्स्टेंडेड वॉरंटी प्रोग्रामसाठी सबस्क्राईब केलं असेल तर होंडा हा कार्यक्रम Civic, Jazz आणि WR-V लादेखील ऑफर करत आहे. लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ही एक ट्रान्स्फरेबल वॉरंटी आहे, जी वाहनाचे पुनर्विक्री मूल्य वाढवेल.

Story img Loader