कार ड्रायविंग करत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कार चालवत असताना अचानक धावत्या कारचा ब्रेक का फेल होतो? ब्रेक फेल झाल्यावर अशा परिस्थितीत कारला कसं थांबवावं? असे प्रश्न तुम्हाला नेहमी पडले असतील. परंतु, तुम्ही घाबरू नका, ब्रेक फेल झाल्यावर कारला थांबवण्यासाठी तातडीनं कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
तुम्ही कार चालक असाल तर सर्वात आधी तुम्हाला कारच्या ब्रेकची बेसिक माहिती समजली पाहिजे. कोणत्याही कारमध्ये चारही बाजूला ब्रेक सिस्टम लावलेला असतो. विशेषत: दोन प्रकारचे ब्रेक्स कारमध्ये लावलेले असतात. ड्रम आणि डिस्क असे या ब्रेक्स सिस्टमचे प्रकार आहेत. ड्रम ब्रेक्सची सिस्टम दिवसेंदिवस बंद होत चालली आहे. हे ब्रेक्स जुन्या गाड्यांमध्ये वापरले जायचे. आता बहुतांश कंपन्यांकडून लॉन्च होणाऱ्या नवीन कारमध्ये डिस्क ब्रेकची सिस्टमचा जास्त वापर केला जात आहे. अनेक गाड्यांमध्ये दोन्ही ड्रम आणि डिस्क ब्रेक लावलेले असतात. कारच्या पुढील बाजूला ड्रम ब्रेक आणि मागच्या बाजूला डिस्क ब्रेक लावलेला असतो.
ब्रेक फेल झाल्यावर काय कराल?
ब्रेक फेल झाल्यावर तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवा. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कारला सावकाश चालवून थांबण्याचा प्रयत्न करा.
हॅजर्ड लाइट्स चालू ठेवा
जर तुम्ही तुमच्या कारला नियंत्रित ठेवलं तर हॅजर्ड लाइट्सला तातडीनं ऑन करा. रस्त्यावरून जात असणाऱ्या लोकांना सतर्क करण्यासाठी हॉर्न वाजवत राहा. कारण हॉर्नचा आवाज ऐकल्यावर तु्म्हाला रस्त्यावरून जाताना लोकांचा अडथळा येणार नाही.
आणखी वाचा – अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पीडितेने धावत्या रिक्षातून उडी घेतली, रस्त्यावर आदळली अन…
ब्रेक पॅडलला सतत पंप करत राहा
कारमध्ये दोन ब्रेकिंग सिस्टम असतात. एक कारच्या पुढील बाजूला आणि दुसरा मागच्या बाजूला लावलेला असतो. ज्यावेळी हे दोन्ही सिस्टम पूर्णपणे बंद होतील, त्यावेळी कारचा ब्रेक फेल झाल्याचे संकेत तुम्हाला इंडिकेटरच्या माध्यमातून दिले जातील. जर दोन्ही पैकी एखादा सिस्टम सक्रिय असेल, तर तुम्हाला कारचा ब्रेक लावण्यात काहीच अडचणी निर्माण होणार नाहीत. त्यासाठी कारच्या ब्रेकला सतत पंप करत राहा आणि कार स्थिर होईपर्यंत ही प्रक्रिया अशीच सुरु ठेवा.
हळूहळू डाउनशिफ्ट करा
या सर्व प्रकिया केल्यावरही जर तु्मच्या कारचा ब्रेक फेल होत असेल, तर कारला थांबवण्यासाठी इंजिन ब्रेकचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला अॅक्सीलेरेटर पॅडलला रिलीज करावं लागेल आणि गियर कमी करावे लागतील. याप्रकारे इंजिन कारच्या गतीला नियंत्रणात आणतो. जर तुम्ही ऑटोमॅटिक वाहन चालवत असाल, तर थ्रोटल पेडलला सोडून द्या आणि कारला मागच्या गियरमध्ये शिफ्ट करा. काही ऑटोमॅटिक कार तुम्हाला पॅडल शिफ्टर्सच्या माध्यमातून गियरबॉक्सला ओवरराईड करायची सुविधाही देत असतात.
हॅंड ब्रेकचा उपयोग करा
जर तुम्ही कारचे गियर कमी केल्यावरही कारला थांबवू शकला नाहीत, तर तुम्ही पार्किंग ब्रेकचा वापर करू शकता. पुढच्या आणि मागच्या ब्रेकिंग सिस्टमशिवाय तुमच्या कारमध्ये पार्किंग ब्रेक सिस्टमही उपलब्ध असतो. या सिस्टमला हॅंड ब्रेक सिस्टम म्हणतात. या ब्रेकच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कारचा वेग नियंत्रणात आणू शकता. परंतु, कारचा वेग जास्त असल्यास या पार्किंग ब्रेकचा वापर करू नका, नाहीतर तुमच्या कारला अपघात होऊ शकतो.