Cheapest Cars with Best Mileage : भारतात स्वस्तात मस्त अशा कारांना लोक अधिक पसंती देतात. येथे लोक कमी खर्चात सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या कार खरेदी करतात. याशिवाय शहरातील गर्दी पाहता लहान गाड्या मोठ्या सेडान किंवा एसयुव्हीच्या तुलनेत अधिक सोयीस्कर असतात. विशेष म्हणजे अशा गाड्यांना पार्किंगला सुद्धा कमी जागेची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी कार शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही कमी बजेटमध्ये असलेल्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या पाच टॉप कारांविषयी माहिती सांगणार आहोत.

मारुती सुझुकी ऑल्टो K10 (Maruti Suzuki Alto K10)

मारुती ऑल्टो K10 सध्या कमी किमतीमध्ये लोकप्रिय कारांमध्ये एक आहे. शहरातील गर्दीमय ठिकाणे असेल किंवा पर्वत रस्ते असतील, ही कार अतिशय वेगाने धावते. ऑल्टो K10 ची सुरुवातीची किंमत ३.९९ लाख होती आणि कारचा मायलेज २४.३९ किमी प्रति लीटर आहे.

मारुती सुझुकी S-Presso (Maruti Suzuki S-Presso )

जर तुम्ही ऑल्टो सारखी लहान मायलेज असणाऱ्या कारच्या शोधात असाल तर मारुती सुझुकी S-Presso हा एक चांगला पर्याय आहे. मायलेज आणि किमतीशिवाय या गाडीची डिझाइन सुद्धा लोकांनी खूप आवडते. या कारची किंमत ४.२६ लाख असून ही कार २४.१२ किमी प्रती लीटर मायलेज देते.

हेही वाचा : Yamaha, Bajaj च्या स्कूटर्सला धोबीपछाड! TVS च्या ‘या’ स्कूटरला तुफान मागणी; खरेदीसाठी लागल्या रांगा, किंमत…

रेनो क्विड (Renault Kwid )

जर तुम्ही बजेट फ्रेंडली कार घेण्याचा विचार करत असाल तर रेनो क्विड हा एक उत्तम पर्याय आहे. आकर्षक डिझाइन आणि मायलेजबरोबर ही कार ग्राहकाच्या पसंतीत उतरली आहे. या कारची तुलना थेट मारुती ऑल्टो K10 बरोबर केली जाते. रेनो क्विड कारची किंमत २.६९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि कंपनीचा दावा आहे की या कारचा मायलेज २१.४६ किमी प्रति लीटर आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)

या लिस्टमध्ये पुढील नाव आहे मारुती सुझुकी सेलेरियो. या कारने मागील काही वर्षांपासून मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला आहे. या कारची किंमत ५.३६ लाख रुपये आहेत आणि २४.९७ किमी प्रति लीटर असा या कारचा मायलेज आहे.

मारुती सुझुकी ईको (Maruti Suzuki Eeco)

जर तुम्ही तुमचे पैसे चांगल्या कारमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकी ईको ही कार तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या कारची किंमत ५.३२ लाख रुपये असून भरपूर जागा असणारी एक उत्तम यूटिलीटी व्हॅन मिळते आणि याशिवाय ३०,००० रुपयांमध्ये सात सीटर कॉन्फीगरेशन मिळू शकते. मारुती ईकोचा मायलेज १९.७१ किमी प्रति लीटर आहे.