Gautam Gambhir car collection : भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची निवड करण्यात आली आहे. गौतमी गंभीर हे भारतीय संघातील एक अष्टपैलु खेळाडू होते. त्यांच्या खेळीविषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण तुम्ही कधी गौतम गंभीरच्या कार कलेक्शनविषयी ऐकले आहे का? आज आपण त्याच्याजवळ असलेल्या गाड्यांविषयी जाणून घेणार आहोत.

Mercedes-Benz GLS 350d : गौतम गंभीरजवळ मर्सिडीज-बेंज GLS 350d ही आलिशान कार आहे. या कारमध्ये ३ लीटर ६ सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन आहे जे २८६ एचपी आणि ६०० एनएमचा पीक पावर आणि टॉर्क निर्माण करते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मर्सिडीजच्या विकसित 4MATIC तंत्रज्ञानाद्वारे चार चाकांना पावर मिळते. या कारची किंमत १.३२ कोटी ते दिड कोटीच्या घरात आहे.

Gyanradha Multistate, cheated, arrest,
तब्बल ३,५१५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रमुखांना अखेर ठोकल्या बेड्या
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
thane education officer challenges suspension over badladpur sex assault in bombay hc
Badlapur Sexual Assault: निलंबनाच्या कारवाईविरोधात ठाण्याचे शिक्षणाधिकारी उच्च न्यायालयात
Woman Naxal Commander, Woman Naxal murder,
नक्षलवाद्यांकडून महिला नक्षल कमांडरची हत्या; पोलिसांशी संबंध असल्याच्या संशयातून…
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?
Cyber ​​criminals, Digital Arrest, How to avoid,
विश्लेषण : सायबर गुन्हेगारांचे नवे अस्त्र… ‘डिजिटल अरेस्ट’! काय आहे हा प्रकार? त्यापासून बचाव कसा?
pune Police commissioner
पुणे: पोलीस आयुक्तांकडून शस्त्र बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाईचे आदेश, पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला पकडले
vegetable price, pune vegetable, pune,
मागणी वाढल्याने भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, मटारच्या दरात वाढ

हेही वाचा : Tata Punch vs Hyundai Exter: बजेटमधील SUV निवडण्यात होतोय गोंधळ? टाटा पंच व ह्युंदाईचे फीचर्स, किंमत पाहा; कोणती बेस्ट ते ठरवा!

BMW 530d: गौतम गंभीरकडे BMW 530d ही आलिशान कार सुद्धा आहे. जरी ही कार सध्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही पण पूर्वी यात ३ लीटर ६ सिलेंडर डिझेल इंजिन लावण्यात आले होते जे २६१ एचपी आणि ६२० एनएमचा पावर आणि टॉर्क निर्माण करायचे.
या इंजिनला ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनबरोबर जोडले आहे. जे चांगले कार्य करते. कारची लांबी ४.९३ मीटरपेक्षा जास्त आहे या गाडीचा व्हिलबेस २.९७ मीटर आहे त्यामुळे गाडीत पुरेशी जागा आणि केबिनची जागा दिसून येते. या कारची किंमत ७४.४९ लाख आहे.

Audi Q5: गंभीरच्या या लिस्टमध्ये SUV Audi Q5 सुद्धा आहे. या कारची किंमत ६५.५१ ते ७२.३० लाख रुपये आहे. अनेक लोकप्रिय लोकांकडे ही कार आहे यात २ लीटर TFSI इंजिन आहे.
हे इंजिन २४९ एचपी आणि ३७० एनएमची पीक पॉवर आणि टॉर्क निर्माण करते. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑडीच्या क्वाट्रो सिस्टीमच्या मदतीने काम करते आणि सर्व चार चाकांना पावर देते. ही कार केवळ ६.३ सेकंदात ०-१०० किमी/तासाच्या वेगाने धावते.

हेही वाचा : अनंत-राधिका मर्चंटच्या ताफ्यातील आलिशान कार पाहिलीत का? मुकेश अंबानी आणि नीता अंबानींनी दिली ‘ही’ कार भेट, किंमत तर…

याशिवाय रिपोर्टनुसार गौतम गंभीरकडे Maruti SX4 आणि Toyota Corolla सारख्या आलिशान गाड्या सुद्धा आहे.