Things to Check in Cars In Rainy Season : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात घराबाहेर पडणे, खुप अवघड जाते. जर तुमच्या कडे कार असेल तर पावसात बाहेर पडणे सोयीस्कर जाते अशात पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाडीतील काही महत्त्वाच्या गोष्टी नीट तपासणे महत्त्वाचे आहे. नुकताच पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे वेळ न घालवता आजच गाडीतील खालील महत्त्वाच्या गोष्टी नीट तपासा.

  • पावसाळ्यात कारचे वायपर नीट असणे आवश्यक आहे. जर तुमच्या कारचे वायपर नीट नसेल तर लगेच नीट करा.जर वायपर स्टिक खराब झाली तर विंडशील्डमधील पाणी नीट स्वच्छ होत नाही आणि काचेवर डाग पडतात त्यामुळे रस्ता नीट दिसत नाही. अशावेळी अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पावसाळ्यात सर्वात आधी गाडीचे वायपर नीट तपासा.

हेही वाचा : किंमत ६ लाख, मायलेज २७.०१ किमी; देशातील बाजारात ‘या’ सर्वात लहान SUV ला तुफान मागणी; ३६५ दिवसात ९३ हजार कारची विक्री

  • सुरक्षित गाडी चालवण्यासाठी कारचे लाइट्स नीट असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात लाइट्सची खूप जास्त गरज भासते. हेडलाइट्सवर लहान मोठा क्रॅक असेल तर लगेच नीट करा. यामुळे गाडीचे लाइट्स चांगला प्रकाश देईल.
  • पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण खूप वाढतात. अशात गाडीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेक नीट असणे आवश्यक आहे. ब्रेक नीट आहे का, हे तपासा जर नसेल तर पावसात गाडी नेण्यापूर्वी ब्रेक नीट करा आणि अपघात टाळा.
  • पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे विंडशिल्डवर धूळ बसते, अशात विंडशिल्ड वॅक्सनी स्वच्छ करा ज्यामुळे दृश्यमानता सुधारेल. नियमित वॅक्सनी गाडी स्वच्छ करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : मारुतीची Wagon R नव्हे तर Tata ची ‘ही’ स्वस्त SUV खरेदीसाठी उडतेय ग्राहकांची झुंबड, ३० दिवसात १८ हजाराहून अधिक गाड्यांची विक्री

  • पावसाळ्यात कारची बॅटरी नीट तपासा. जर बॅटरी ठीक असेल तर गाडीचे सर्व लाइट्स पूर्ण क्षमतेने सुरू राहतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी कारची बॅटरी नीट पाहा.
  • पावसाळ्यात घराबाहेर पडण्यापूर्वी गाडीचे टायर चेक करा. त्याचबरोबर गाडीमध्ये जास्तीचा एक टायर ठेवा. कधी टायर बदलण्याची वेळ आली तर मदत होईल आणि इतर टायर बदलण्यास लागणारे साहित्य सुद्धा ठेवा.

पावसाळ्यात कारने प्रवास करताना या वरील महत्त्वाच्या गोष्टी नीट तपासा आणि ज्यामुळे तुमच्या प्रवासात अडचणी येणार नाही आणि प्रवास चांगला होईल.