ऑटोक्षेत्रानं गेल्या काही वर्षात भरारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. गाड्या खरेदी करण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामुळे कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे मॉडेल बाजारात आणत आहेत. सध्या भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
सध्याच्या युगात चारचाकी गाडी गरज बनली आहे. मात्र गाडी खरेदी करताना लोकं गोंधळून जातात. तुम्हीही पहिल्यांदा स्वत:साठी कार घेण्याचा विचार करत असाल, परंतु खूप गोंधळात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गाडी खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्याचा फटका आपल्याला नंतर सहन करावा लागतो. म्हणूनच आपण नेहमी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आज आम्ही तुमच्यासाठी काही खास टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या तुमच्यासाठी कार निवडण्यात उपयुक्त ठरतील.
- कार खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजेट. शोरूममध्ये गाड्यांची वेगवेगळी मॉडेल्स आहेत, ज्यांच्या किंमती कमी होत जातात. त्यामुळे सर्वप्रथम बजेट ठरवून त्यावर आधारित बाकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
- वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कार खरेदी करताना मायलेज आणि मेंटेनन्सची माहिती घेणेही खूप गरजेचे आहे. खरे तर दरवर्षी कारमधील सेवेबरोबरच विम्यासह इतर देखभालीसंबंधीच्या कामांवरही मोठा खर्च केला जातो. कारचे मायलेज चांगले असावे जेणेकरून तुम्ही असा खर्च टाळू शकता.
- तुम्ही कारचे संपूर्ण रिसर्च करा जसे की किती पैसे खर्च केले पाहिजेत, रिव्ह्यू कसे आहेत, देखभालीचा खर्च किती आहे, कारचे मायलेज किती आहे, जेणेकरून तुम्हाला जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
- कार घेताना आपल्याला आवश्यक असलेल्या कारची आसनक्षमता देखील लक्षात ठेवावी. जर तुमचे कुटुंब मोठे असेल तर तुम्ही ७ सीटर कार घेऊ शकता.
- सुरक्षेचाही विचार करायला हवा. कार घेताना एअरबॅगकडे लक्ष द्या, कारण अपघाताच्या वेळी एअरबॅग खूप उपयुक्त ठरतात. अपघातात गंभीर दुखापत होण्यापासून वाचवते.