New Car launches In July Month : ऑटोमोबाइल क्षेत्रात जुलै महिना हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण या महिन्यात काही आलिशान कार लाँच होणार आहे. या आलिशान कारांमध्ये बीएमडब्ल्यू पासून मिनी कूपर पर्यंत मोठ्या गाड्यांचा समावेश आहे. जाणून घेऊ या, जुलै महिन्यात कोणत्या आलिशान गाड्या लाँच होणार आणि केव्हा लाँच होणार?

BMW 5 Series LWB

बीएमडब्ल्यूची पाचवी सीरीज LWB २.० लीटर टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांबरोबर लाँच केली जाणार. या दोन इंजिनला माइल्ड हायब्रिड सिस्टीम आणि ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनबरोबर जुळवण्यात येईल. बीएमडब्ल्यूची पाचवी सिरीज लाँग व्हिलबेस २४ जुलैला लाँच करण्यात येईल.

Nissan X-Trail

निसान एक्स ट्रेलला १.५ लीटर तीन सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनसह लाँच केले जाण्याची शक्यता आहे. हे युनिट २०१ बीएचपी आणि ३०५ एनएम जनरेट करते आणि याला सीव्हिटी बरोबर जोडले जाते. निसान AWD लाँच केली जाणार की नाही, याविषयी माहिती नाही. निसानने त्याच्या येत्या प्रिमियम एसयुव्ही, एक्स ट्रेलचा एक टिझर लाँच केला आहे. लवकरच हा मॉडेल बाजारात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : BMW Electric Scooter: बीएमडब्ल्यूची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात धमाका करणार; किंमत आणि जबरदस्त वैशिष्ट्ये जाणून घ्या

Mini Cooper S

मिनी कूपरने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये जागतिक स्तरावर सुरूवात केली होती. कूपर सी आणि कूपर एस या दोन ट्रिममध्ये मिनी कूपर लाँच केली जाणार आहे ज्यामध्ये २०१ बीएचपी १.५ लीटर ३ सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि २०१ बीएचपी २.० लीटर चार सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. मिनी इंडियाने घोषणा केली होती की नव्या जनरेशनची कूपर एस २४ जुलै ला लाँच केली जाणार.

Mini Countryman Electric

मिनी कंट्रीमॅन इलेक्ट्रिकमध्ये BMW iX1 बरोबर अनेक फीचर्स दिले आहेत. या इलेक्ट्रिक एसयुव्हीमध्ये दोन प्रकार येतात. E आणि SE ALL4. दोन्ही प्रकारामध्ये ६४.७ kwh बॅटरी पॅक दिला आहे. बेस प्रकारामध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर आहे जो २०४ बीएचपी आणि २५० एनएम जनरेट करते याशिवाय SE प्रकारात डुअल इलेक्ट्रिक मोटर आहे जी ३१३ बीएचपी आणि ४९३ एनएम निर्माण करते. E प्रकार ४६१ किमी रेंज प्रदान करतो तर SE एकदा चार्ज केल्यानंतर ४३३ किमीचे अंतर पार करते.मिनी इंडियाने सांगितल्याप्रमाणे, ही गाडी २४ जुलै ला लाँच करण्यात येईल.

Mercedes-Benz EQA

मर्सिडीज बेन्झने EQA ला एंट्री लेव्हल प्रिमियम इलेक्ट्रिक एसयुव्हीच्या रुपात EQB च्या खाली ठेवले आहे. हा GLA क्रॉसओवर चा इलेक्ट्रिक प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात EQA चार प्रकारात उपलब्ध आहे. याचे सर्व प्रकार ६६.५ kWh बॅटरीसह ५६० किमी रेंज प्रदान करतात. मर्सिडीज-बेंज ही ८ जुलै रोजी EQA ला लाँच करणार आहे.