No Objection Certificate : अनेकदा आपल्याला नवीन गाडी खरेदी करायची असते. अशावेळी आपण जुनी गाडी विकतो पण तुम्हाला माहिती आहे का जुन्या गाडीची विक्री करताना किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात ट्रान्सफर करताना काही कागदपत्रांची आवश्यकता भासते. त्यातील एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे एनओसी (NOC). गाडी दुसर्‍या राज्यात विकताना किंवा खरेदी करताना गाडीचा मालक आरटीओमधून एनओसी प्रमाणपत्र काढून देतो. जेणेकरून खरेदी करणारा व्यक्ती त्याच्या राज्यात नवीन रजिस्ट्रेशन नंबर साठी अर्ज करू शकतो. (How To Obtain A NOC From The RTO: A Step-by-Step Guide | Learn how to easily obtain a No Objection Certificate (NOC) from the RTO)

एनओसी प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे आणि अनिवार्य कागदपत्र आहे ज्याद्वारे वाहनाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक नियमांद्वारे ट्रान्सफर केले जाते. दुचाकी असो किंवा चार चाकी, सार्वजानिक असो किंवा खाजगी, सर्व वाहनांसाठी एनओसी आवश्यक आहे.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

आरटीओकडून एनओसी प्रमाणपत्र तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रक्रियेद्वारे मिळवू शकता. हे एनओसी प्रमाणपत्र गाडी विक्री करताना किंवा खरेदी करताना महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : बाजारपेठेत उडाली खळबळ, सीएनजी बाईक सादर केल्यानंतर बजाज करणार आणखी मोठा धमाका, जाणून घ्या नवी योजना

आरटीओमधून एनओसी प्रमाणपत्र काढण्याची ऑनलाइन प्रक्रिया

आरटीओ वेबसाइटवर जा आणि एनओसी ऑनलाईन अर्ज भरा.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, जसे की वाहन नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर भरा
ऑनलाइन पेमेंट करा आणि त्यानंतर अर्ज नीट भरा.
तुमचा अर्ज RTO द्वारे तपासला जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला एनओसी प्रमाणपत्र दिले जाईल.

हेही वाचा : Top 5 vehicles in Google trends: गूगलवर चर्चेत असलेले पाच सर्वोत्तम कार आणि बाइक, जाणून घ्या त्यांची किंमत्त अन् फिचर्स

आरटीओकडून एनओसी मिळविण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया

तुमच्या जवळच्या आरटीओ कार्यालयात जा आणि एनओसीचा अर्ज भरा
त्यात विचारलेली आवश्यक कागदपत्रे अर्जाला जोडा. जसे की वाहन नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखला इत्यादी.
नीट अर्ज भरल्यानंतर आवश्यक शुल्क जमा करा.
तुमच्या अर्ज RTO द्वारे तपासला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला एनओसी प्रमाणपत्र दिले जाईल.

वाहनासाठी एनओसी प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या वाहनाचा विमा आणि रजिस्ट्रेशन अपडेटेड आहे का, याची खात्री करा