आपल्याकडे दसरा-दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर घर, कार यांसारख्या अनेक नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. दिवाळीच्या काळात नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत मोठया संख्येने लोक कार खरेदी करण्याचा विचार करतात. जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणतीच अडचण भासणार नाही. जाणून घेऊया कार खरेदी करताना कोणती कागदपत्रे सोबत ठेवायला हवी.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड
कार खरेदी करताना आधारसोबतच पॅन कार्डही जवळ ठेवणे आवश्यक आहे. पॅन कार्डमध्ये तुमच्या फोटोसोबत एक युनिक नंबर असतो. व्यवहाराच्या वेळी तो क्रमांक देणे आवश्यक आहे. या युनिक नंबरमुळे तुमच्या वतीने केलेल्या व्यवहारांची संपूर्ण माहिती उपलब्ध होते.
आणखी वाचा : मॅटर ‘मेड-इन-इंडिया’ पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल ‘या’ दिवशी लाँच करणार
वीज बिल आणि रेशन कार्ड
नवीन कार खरेदी करताना वीज बिल, रेशन कार्ड किंवा भाडे कराराचाही वापर केला जातो. यापैकी कोणतेही एक कागदपत्र पत्ता पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते. तुमचे स्वतःचे घर असेल तर वीज बिल किंवा रेशन कार्ड वापरता येते. पण तुम्ही कुठेतरी भाड्याने राहत असाल तर भाडे कराराद्वारे तुम्ही नवीन कार खरेदी करू शकता.
कार पेमेंट पावती
जेव्हाही तुम्ही नवीन कारची डिलिव्हरी घेण्यासाठी जाताय तेव्हा गाडीच्या बुकिंगपासून ते पूर्ण पैसे भरण्यापर्यंतच्या सर्व पावत्या सोबत घ्या. कोणत्याही कारणास्तव पेमेंटबाबत काही संभ्रम असल्यास, सोबत आणलेल्या सर्व पावत्या दाखवून देयकाची माहिती दिली जाऊ शकते.