Bad smelling cabin in car: गाडीला फक्त बाहेरून स्वच्छ पुसून चकचकीत केले म्हणजे ती स्वच्छ होत नाही. कारण- गाडी जितकी बाहेरून चकचकीत आणि नेटकी दिसणे गरजेचे असते, तितकेच ती आतूनही स्वच्छ असायला हवी. एखाद्या लांबच्या प्रवासासाठी जाताना या गोष्टींचीदेखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा गाडीमध्ये बसूनच अनेक जण काही खाद्यपदार्थ खातात. मात्र, या खाद्यपदार्थांच्या प्लेट्स, पिशवी वेळच्या वेळी कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली नाही, तर त्यामधून दुर्गंध येण्यास सुरुवात होते. त्याशिवाय काही पदार्थांचे लहान लहान कण गाडीत पडून राहतात. अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे गाडीमध्ये घाणेरडा वास किंवा दर्प पसरू शकतो. मात्र, असे न होऊ नये यासाठी आणि गाडी सतत सुगंधी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गाडी सुगंधी ठेवण्याच्या पाच सोप्या टिप्स खालीलप्रमाणे :

एअर व्हेंट्स साफ करणे

गाडीमध्ये असणारे एसी एअर व्हेंट्स जर धुळीने माखले असतील, तर त्यामुळे गाडीत धुळकट हवा आणि दर्प येत राहतो. त्यांमध्ये अनेक जीवजंतूसुद्धा असतात; जे केवळ गाडीसाठीच नव्हे, तर तुम्हालादेखील त्रासदायक ठरू शकतात. हे एअर व्हेंट्स स्वच्छ ठेवण्यासाठी एखाद्या स्पंजचा किंवा कान साफ करणाऱ्या इयरबड्सचा वापर करू शकता. त्यासह जेव्हा एसी वापरात नसेल तेव्हा त्याची फ्लॅप बंद करून ठेवा.

कॉफीच्या बियांचा वापर

कॉफीच्या बियांचा गंध वातावरण सुगंधी करण्यास फायदेशीर असतो. गाड्यांमध्ये लावले जाणारे फ्रेशनर महाग वाटत असल्यास कॉफीच्या बिया हा अत्यंत सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. इतकेच नव्हे, तर दुर्गंध किंवा दर्प या बिया शोषून घेऊ शकतात. त्यासाठी एखाद्या कापडामध्ये किंवा पेपरमध्ये या बिया गुंडाळून गाडीमध्ये ठेवा आणि दर आठवड्याला त्या बदलत राहा.

इसेन्शियल ऑइलचा वापर

अनेकदा आपण इसेन्शियल ऑइलबद्दल ऐकले आहे. त्याचा वापर शक्यतो सौंदर्यप्रसाधनांमध्ये किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. मात्र, हे तेल गाडीमधील दुर्गंध घालवण्यासाठीही उपयोगी असते. या तेलाचे केवळ दोन ते तीन थेंब गाडीला बऱ्याच काळासाठी सुगंधी आणि प्रसन्न ठेवतात. तुम्ही हे तेल डिफ्युजरमध्ये घालून ठेवू शकता.

सेंटेड कँडल्स

या सुगंधी मेणबत्त्या मन शांत करण्यासाठी, ध्यान लावून बसण्यासाठी थोडक्यात ‘रिलॅक्स’ करण्यासाठी वापरल्या जातात. मात्र, या मेणबत्त्या तुम्ही तुमच्या गाडीतील डॅशबोर्डवर ठेवल्यात तरीही तुमची गाडी सुगंधी होऊ शकते. डॅशबोर्डवर जेव्हा ऊन पडेल तेव्हा आपोआप त्या उष्णतेने मेण वितळण्यास सुरुवात होईल आणि त्याचा हलकासा गंध गाडीत दरवळत राहील.

हेही वाचा: ‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

गाडीच्या काचा खाली करा

बराच वेळ गाडीच्या काचा बंद राहिल्यामुळे गाडीत हवा खेळती राहत नाही आणि ताजी हवा आत येत नाही. त्यामुळेही कधीतरी गाडीमध्ये दुर्गंध येऊ शकतो. त्यामुळे अधूनमधून गाडीच्या सर्व काचा थोड्या वेळासाठी खाली करून ठेवा.