White smoke in car: तुम्ही अनेकदा रस्त्यावरून जाताना कुठल्या तरी वाहनातून पांढरा-काळा धूर निघताना पाहिला असेल. पण, असे का होत असेल? अनेकांना असे वाटते की, गाडीमधून धूर निघणे ही एक नॉर्मल गोष्ट आहे आणि म्हणूनच बहुतेक लोक त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. परंतु, जर तुमच्या वाहनातून पांढरा धूर निघत असेल, तर वाहनाच्या इंजिनामध्ये काही समस्या असू शकते हे तुम्ही वेळीच ओळखले पाहिजे. ही समस्या लहान किंवा मोठी किंवा यामागे अनेक कारणेही असू शकतात.
वाहनातून धूर निघण्याचे कारण
बऱ्याचदा थंडीमध्ये इंजिन गरम झाल्यावर वाफ सोडते. त्यामुळे गाडीच्या मागील बाजूनेही पांढरा धूर निघतो. मात्र, काही काळानंतर तो थांबतो.
- सिलिंडरची रिंग्स खराबी झाल्यामुळे समस्या
बाईकच्या इंजिनमधील सिलिंडरच्या रिंग किंवा व्हॉल्व्हचे सील खराब झाल्यामुळे इंजिनामध्ये तेलगळती सुरू होते. ते तेल इंधनासह जळते आणि पांढरा धूर तयार करते. त्यामुळे तेल तर लवकर संपतेच; पण इंजिनाचेही त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.
- कमी कूलंट पातळी
वाहनाच्या एक्झॉस्टमधून निघणारा पांढरा धूर वाहनातील कूलंटची पातळी कमी झाल्याचे सूचित करतो. त्यासह इंजिनच्या ज्वलन कक्षामध्ये काही प्रकारची कूलंट गळतीदेखील असू शकते. तुमच्या वाहनाच्या बाबतीत अशी अडचण आली, तर मोठी अडचण आहे. त्याशिवाय हेड गॅस्केटमध्ये समस्या आणि सिलिंडरच्या वरच्या भागात अडथळा किंवा क्रॅकमुळेदेखील ही समस्या उद्भवू शकते.
- कार-बाईक ओव्हरहीटिंग झाल्यास
जेव्हा वाहन जास्त तापते तेव्हा वाहनाच्या एक्झॉस्टमधून पांढरा धूर निघतो. जर कूलंटची पातळी कमी असेल आणि कूलंटची गळती होत असेल, तर वाहन जास्त गरम होते. अशा परिस्थितीत सर्व समस्यांमुळे एक्झॉस्टमधून पांढरा धूर निघतो. तसेच इंजिनाच्या व्हॅक्युममधील कमी दाबामुळेही या प्रकारची समस्या अनेकदा उद्भवते.
- कूलिंग सिस्टीममध्ये समस्या
कार किंवा बाईकमधून पांढरा धूर निघण्यामागे अजून एक कारण असू शकते. वाहनाचे इंजिन जास्त गरम होणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रत्येक वाहनामध्ये कूलिंग सिस्टीम असते. अशा परिस्थितीत कूलिंग सिस्टीममध्ये हवा भरली तरी वाहनातून पांढरा धूर निघतो.
हेही वाचा: सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
वाहनातून धूर आल्यास काय करावे?
वाहनाच्या एक्झॉस्टमधून पांढरा धूर निघणे ही मोठी समस्या बनता कामा नये. अशा परिस्थितीत त्याची वेळोवेळी देखभाल ठेवणे खूप महत्त्वाचे आहे आणि अशी चिन्हे दिसल्यास ताबडतोब मेकॅनिककडे जा. तसेच वाहनामध्ये नेहमी ब्रॅण्डेड तेल आणि चांगल्या दर्जाचे पेट्रोल भरा. तसेच, आवश्यकतेपेक्षा जास्त तेल कधीही टाकू नका.