Car Heater: देशात थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत लोक आता गाडी चालवताना कारमध्ये थंडी टाळण्यासाठी हिटर आणि ब्लोअरचा वापर करतात. त्यामुळे गाडीत थंडी जाणवत नाही आणि गाडी चालवणे सोपे होते. परंतु त्याच्या वापराबाबत घेतलेला काही निष्काळजीपणा तुमच्या जीवावरही बेतू शकतो. हे टाळण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुका सांगणार आहोत, ज्या तुम्ही चुकूनही करू नये. चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत.
आपल्या कारमध्ये हिटर किंवा ब्लोअर लावणं थंडीच्या दिवसांत बरंच मदतीचं ठरत असलं तरीही काही प्रसंगी ते आपल्याला जबर महागात पडू शकतं. अशाही घटना घडल्या आहेत जिथं कारमधील हिटर सुरु ठेवून झोपल्यामुळं चालकाचा मृत्यू ओढावला आहे. त्यामुळं तसूभर हलगर्जीपणाही तुम्हाला महागात पडू शकतो.
कारमध्ये हिटर किंवा ब्लोअर वापराताना ‘या’ चूका टाळा
ऑक्सिजनची कमतरता
तुम्ही कारमध्ये हिटर किंवा ब्लोअर बराच वेळ लावून बसत असाल आणि कारच्या खिडक्या बंद असतील तर कारमध्ये ऑक्सिजनची (oxygen) कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला गुदमरल्यासारखे होते. असे होऊ नये म्हणून तुमच्या कारची खिडकी थोडी उघडा. वाहनांमध्ये एअर सर्कुलेशन ऑन-ऑफ करण्यासाठी एक बटण असते त्यामुळे तुमच्या वाहनात ताजी हवा भरली जाते.
(आणखी वाचा : पार्किंगमधून वाहन चोरीला गेल्यास काय कराल? जाणून घ्या यासंबंधीचे नियम )
विंडस्क्रीनवरील धुके
थंडीच्या दिवसात जर तुम्ही हीटर वापरत असाल तर वाहनाच्या आतील तापमान जास्त वाढू देऊ नका. कारण थंडीच्या दिवसात कारचे आतील तापमान वाढते आणि बाहेरचे तापमान खूप कमी असते.त्यामुळे वाहनाच्या विंडस्क्रीनवर धुके साचतात. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यासाठी थोडा वेळ एसी चालवावा.
CO2 गॅस तयार होऊ देऊ नका
सतत तुम्ही हिटर किंवा ब्लोअर चालू ठेवत असाल तर कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइडसारखे वायू कारच्या आत तयार होतो. असे झाल्यास तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. कारमध्ये असताना श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत काहीच अडथळे येऊ नयेत यासाठी Car मधील On- Off Air सर्क्युलेशनचं फिचर Active ठेवा. असं केल्यास बाहेरची (नैसर्गिक हवा) हवा आत येऊन आतील हवा बाहेर जाईल. हे फिचर Active ठेवल्यामुळे कारमधील हवा खेळती राहील आणि हिटर किंवा ब्लोअर सुरू असताना दुर्घटना होण्याची शक्यता टळेल.
लहान मुलांना एकटे सोडू नका
अनेकजण आपल्या मुलांना हीटर किंवा ब्लोअर चालू करून गाडीतच ठेवतात. जर तुम्हीही चूक करत असाल तर ही चूक टाळा, कारण तुमच्या मुलाने गाडी आतून लॉक केली तर तुम्हाला त्याचा फटका बसेल. त्याचबरोबर ब्लोअर चालू असेल तर मुले गुदमरू शकतात.
इंधन
सततच्या हिटर वापरामुळे कारमध्ये असणारं इंधनही अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं संपतं, ज्याचा आर्थिक गणितावरही परिणाम होतो. त्यामुळं हिटर वापरताना जरा जपूनच वापरा. त्यामुळे जर तुम्हीही हिटर आणि ब्लोअरचा वापर करत असाल तर या चुका करू नका. या चुका टाळा नाहीतर यामुळे तुमचा किंवा इतरांचा जीव जाऊ शकतो.