Scooty Driving Tips: भारतातील अनेक जण बाईकऐवजी स्कुटी चालवण्याला अधिक पसंती देतात. पुरुषांबरोबरच महिलाही मोठ्या संख्येने त्यांच्या दैनंदिन आयुष्यात स्कुटीने प्रवास करतात. बाजारातही अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या स्कुटी उपलब्ध आहेत. प्रमुख कंपन्यांमध्ये होंडा, हीरो, टीव्हीएस, सुझुकी, यामाहा या कंपन्यांचा दबदबा आहे; परंतु तरीही त्यामध्ये होंडा आघाडीवर असून, त्यांचा स्कुटी ॲक्टिव्हा हा सर्वांत यशस्वी ब्रॅण्ड आहे.
देशात दरवर्षी सुमारे ५० लाखांहून अधिक स्कुटी विकल्या जातात. त्यात होंडा, ॲक्टिव्हा या मोठ्या ब्रॅण्डचा समावेश आहे. देशाच्या एकूण स्कूटर मार्केटमध्ये होंडाचा वाटा सुमारे ४६ टक्के आहे.
दरम्यान, स्कुटीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे; जवळपास ९०% लोक चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवतात. त्यामुळे स्कुटी लवकर खराब होऊन, त्याचे इंजिनही लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच तुमच्या स्कुटीचे मायलेजही कमी होते. असो! चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालविल्याने मायलेज ३०-३५ किमी प्रतिलिटरपर्यंत खाली येते.
खरे तर, स्कुटी चालविताना सायकलप्रमाणेच पुढच्या आणि मागच्या चाकांसाठी दोन्ही हातांनी ब्रेक वापरावा लागतो. स्कुटीमध्ये क्लच नसतो. अशा परिस्थितीत जेव्हा अनेक जण स्कुटी चालवतात तेव्हा त्यांचा हात ब्रेकवर असतो. त्यामुळे सातत्याने ब्रेकचा वापर केला जातो. अशा स्थितीत लोक ब्रेकवर हात ठेवतात आणि अॅक्सिलेटरचाही वापर करतात. कोणतेही वाहन चालविण्याचा हा सर्वांत वाईट मार्ग आहे. त्यामुळे इंजिनावर ताण पडतो आणि ब्रेकसोबतच इंजिनची क्लच प्लेटही लवकर झिजते. मग त्यामुळे तुमची स्कुटी जास्त पेट्रोल वापरते.
हेही वाचा: रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत
या पद्धतीने स्कुटी चालेल सुरळीत
जर तुम्ही नियमितपणे स्कुटी चालवत असाल, तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की, जर तुम्ही ४५-५० च्या वेगाने गाडी चालवली आणि विनाकारण ब्रेकवर हात ठेवला नाही, तर तुमची स्कूटी सुरळीत चालते. इंजिनावर कोणताही ताण येत नाही आणि क्लच प्लेटही व्यवस्थित राहते.
तसेच स्कुटी अचानक थांबवू नका. स्कुटी थांबविण्यासाठी, प्रथम तिचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करा. शक्य तितका कमी ब्रेक वापरा. गाडीचा वेग अचानक वाढवू नका किंवा अचानक थांबवू नका. अशी चांगली सवय मुळे इंजिनाचे आयुष्य अधिक वाढते. जर तुम्ही कमी ब्रेक वापरून स्कुटी चालवली आणि इंजिन ऑइल नियमित बदलत राहिलात, तर तुमच्या स्कुटीचे इंजिन १० ते १५ वर्षे तरी उघडण्याची गरज भासणार नाही.