How to get Learning Licence : भारतात गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे ज्याला आपण वाहन चालक परवाना म्हणतो. वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी लायसन्स हे आवश्यक असते. जेव्हा तुमचे वय १८ वर्ष पूर्ण असेल आणि तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला पोलीस पकडू शकतात आणि त्यावर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. जर तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रियेद्वारे करू शकता. यामुळे तुम्ही कोणताही वाहतूक नियम न मोडता रस्त्यावर गाडी चालवू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे? ते अगदी सोपे आहेत. (know online and offline process of Learning Licence)
लर्निंग लायसन्स बनवण्याच्या दोन प्रक्रिया आहेत. एक ऑनलाइन प्रक्रिया आणि दुसरी ऑफलाइन प्रक्रिया. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही प्रकारे ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता.
हेही वाचा : Skoda Kylaq: टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली स्कोडा Kylaq; मिळणार अनेक नवीन बदल, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
लर्निंग लायसन्स बनवण्याची ऑनलाइन प्रक्रिया
- तुमच्या राज्याच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- वेबसाइटवर दिलेल्या लिंक वरून लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करा.
- विचारलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. जन्माचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आणि ओळखपत्रासारखे आवश्यक कागदपत्रांना स्कॅन करा आणि कागदपत्रे अपलोड करा.
- नीट अर्ज भरल्यानंतर अर्ज शुल्क भरा.
- परिक्षेची तारीख आणि वेळ निवडा.
- उमेदवाराला लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच लर्निंग लायसन्स दिले जाईल.
लर्निंग लायसन्स बनवण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया
- जवळच्या आरटीओ कार्यालयात भेट द्या.
- अर्ज भरण्यासाठी फॉर्म घ्या.
- अर्ज नीट भरा. अर्जाबरोबर जन्माचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो आणि ओळखपत्रासारखी आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज शुल्क भरा
- परीक्षेची तारीख आणि वेळ निवडा.
- लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हा.
- परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन्स दिले जाणार.
अनेकदा आपण लायसेन्स काढतो पण कार्ड हातात येण्यास एक ते दिड महिने लागतात. या एक ते दिड महिन्याच्या कालावधीत गाडी चालवता येते का? असा प्रश्न पडतो. अशा वेळी डिजिलॉकर हे सरकारमान्य अधिकृत अॅपचा वापर करून तुम्ही ऑनलाइन लायसन्स मिळवू शकता.
© IE Online Media Services (P) Ltd