Driving License Digilocker : ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालक परवाना कागदपत्र हे वाहनचालकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी लायसेन्स हे आवश्यक असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा आपण लायसेन्स काढतो पण कार्ड हातात येण्यास एक ते दिड महिने लागतात. या एक ते दिड महिन्याच्या कालावधीत गाडी चालवता येते का? डिजिलॉकरचा कसा उपयोग करायचा, याविषयी इन्स्टाग्रामवर आरटीओ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. काय म्हणाले हे आरटीओ अधिकारी जाणून घेऊ या.

हेही वाचा : नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर थांबा; टीव्हीएस २२ ऑगस्टला करणार मोठा धमाका, नवीन स्कूटरचा टीझर रिलीज

या व्हायरल व्हिडीओमध्ये आरटीओ अधिकारी शिवाजी विभुते सांगतात, “बऱ्याचदा नागरिकांकडून अशी विचारणा होते की ड्रायव्हिंग टेस्ट दिलेली आहे, ड्रायव्हिंग टेस्ट पास झालेलो आहोत, परंतू तुमचे लायसन्स बाय पोस्ट यायला कधी कधी एक महिना तर कधी कधी दिड महिना पण लागतो मग या दिड महिन्याच्या वेळेमध्ये गाडी चालवायची की नाही, प्रश्न पडतो. कारण लायसन्स तुमच्या हातात आलेले नसते तर अशा वेळी काय करायचे? तर एक साधा उपाय तुम्हाला सांगतो. तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट पास झाल्यानंतर पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये तुमचे हे अप्लीकेशन ऑनलाइन सर्व्हरला अप्रुव्ह होते आणि अप्रुव्ह झाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरताना जो मोबाइल नंबर तु्म्ही या ठिकाणी दिला आहे त्या मोबाइलवरती अप्रुव्हचा मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये तुम्हाला एक नंबर दिलेला असतो, तो तुमचा ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर असतो. तुम्ही फक्त त्या ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर घ्यायचा आणि डिजिलॉकर हे सरकारमान्य अधिकृत अॅप आहे त्यात हा नंबर टाकायचा आणि तुम्हाला तुमच्या येथे तुमचे लायसन्स मिळून जाईल. हे लायसन्स तुम्ही भारतभर वापरू शकता.तुम्ही डिजिलॉकरचा उपयोग करून हे लायसन्स वापरू शकता.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : अचानक गाडीचे ब्रेक फेल झाले तर काय कराल? आरटीओ अधिकाऱ्याने सांगितली सोपी ट्रिक, Video एकदा पाहाच

rto_shivajivibhute या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ड्रायव्हिंग लायसन्स”

या व्हिडीओवर काही युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली” काही युजरने आभार व्यक्त केले तर काही युजरनी प्रश्न सुद्धा विचारली आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driving licence if you passed driving licence and waiting for card then how to use digilocker app while driving rto officer told video viral ndj