How to Drive like pro in Indian Roads: भारतामध्ये गाडी चालवणे खूपच कठीण काम आहे. कारण खरं सांगायचं झालं तर रस्त्यावर खूप लोक अगदी बेफिकीरीने वागतात. दुसरा ड्रायव्हर कसा वेग वाढवेल किंवा ब्रेक लावेल किंवा तुमचा मार्ग कसा अडवेल याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे भारतीय रस्त्यांवर वाहन चालवताना तुम्हाला नेहमी अत्यंत सावध राहावे लागते.
अलीकडेच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एका व्यक्तीने भारतीय रस्त्यांवर गाडी चालवण्यासाठी एक नवीन पद्धत सांगितली आहे. ती पद्धत म्हणजे ABCD…
भारतीय रस्त्यावर गाडी चालवण्याची ABCD
या सोप्या तंत्राचा वापर करून भारतीय रस्त्यांवरून सहजपणे वाहने कशी चालवता येतील हे सांगणारा हा व्हिडीओ DriveSafe ने त्यांच्या चॅनेलवर YouTube वर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने स्पष्ट केले की, जर एखाद्या व्यक्तीने या ABCD चे अनुसरण केले, तर तो एक चांगला आणि कुशल ड्रायव्हर बनू शकतो आणि आपल्या देशाच्या रस्त्यांवर वाहन चालवताना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
A – Assess and Anticipate (मोजमाप आणि अंदाज)
गाडी चालवताना पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्त्याचे मोजमाप करणे. नेहमी लक्ष द्या आणि पुढे काय होणार आहे याची पारख करा.
A चा अर्थ अंदाजदेखील आहे. आपल्या पुढे चालणारे इतर ड्रायव्हर्स काय करू शकतात याचाही अंदाज लावला पाहिजे. याच्या मदतीने वाहनचालक अपघात टाळू शकतात.
B – Be patient and BHP (धीर धरा)
ड्रायव्हर नमूद करतो की, B चा अर्थ “बी पेशंट” आहे. भारतीय रस्त्यांवरील अनेक ड्रायव्हर्स खूप अधीर असतात आणि त्यामुळे ते त्यांची वाहने अशा परिस्थितीत चालवतात, जिथे इतरांना जाणे कठीण होते. तसंच ट्रॅफिक जॅममधून नेव्हिगेट करताना धीर धरा. यानंतर B चा अर्थ BHP देखील होतो. जर तुमची कार समोरच्या कारपेक्षा अधिक पॉवरफुल आहे, त्यामुळे तुम्ही त्या गाडीला आत्मविश्वासाने पटकन मागे टाकू शकता.
C – Confidence and considerate (आत्मविश्वास आणि विचारशील)
C म्हणजे आत्मविश्वास. भारतीय रस्त्यांवर ओव्हरटेक करताना खूप आत्मविश्वास असायला हवा, असे चालक नमूद करतात. जर तुम्हाला वाटत असेल की हे अंतर पुरेसे नाही किंवा तुम्ही परिस्थितीचे योग्य मूल्यांकन केले नाही, तर माघार घेणे चांगले. याउलट जर तुम्हाला पुरेसा आत्मविश्वास असेल तर तुम्ही पटकन युक्ती करून गाडी पुढे नेऊ शकता.
तसेच तो ठळकपणे सांगतो की, C चा अर्थ रस्त्यांवरील इतरांसाठी विचारशील आहे. अनेक ड्रायव्हर रस्त्यावर वाहन चालवताना विचार करत नाहीत आणि ते घाईघाईने ओव्हरटेक करतात, त्यामुळे तुमच्या ड्रायव्हिंग स्टाईलमुळे इतरांना त्रास सहन करावा लागू नये याची तुम्ही काळजी घ्या, असे तो सांगतो.
D – Distanced and Defensive (दूरस्थ आणि बचावात्मक)
शेवटी डी बद्दल बोलताना ड्रायव्हर स्पष्ट करतो की, भारतीय रस्त्यावर गाडी चालवताना योग्य अंतर असावे. तो अधोरेखित करतो की, अनेक वेळा समोरून गाडी चालवणारे लोक अनियंत्रित ओव्हरटेक करतात किंवा शक्य नसताना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा वाहनांपासून योग्य अंतर ठेवून अपघात टाळण्यासाठी बचावात्मक पद्धतीने वाहन चालवणे चांगले.