Driving Test New Rules : आपल्या भारतात ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे वाहतूक परवाना मिळवण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आणि कंटाळवाणी आहे. वाहतूक परवाना मिळविण्यासाठी सुरुवातीला अर्जदाराला एक परवाना काढण्यासाठी विविध एजन्सीना भेट द्यावी लागते, अनेक फॉर्म्स भरावे लागतात. अशा गुंतागुंतीच्या आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे अनेकदा गैरव्यवहार होण्याची शक्यतादेखील वाढू शकते; ज्याचा दुष्परिणाम हा भारतातील वाहतूक आणि नागरिकांची सुरक्षितता यांच्यावर होऊ शकतो.

या सर्व गोष्टींचा विचार करून, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील सध्याच्या वाहतूक नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही बाब नागरिकांची सुरक्षा आणि परवाना मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. हे बदल १ जूनपासून होणार आहेत. नेमक्या गोणत्या गोष्टींमध्ये बदल करण्यात येणार आहेत ते पाहू.

ECI remove NCP Ajit Pawar Faction Ad
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नवी जाहीरात वादात, निवडणूक आयोगाकडून आक्षेप; निवडणुकीच्या तोंडावर नामुष्की
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
Champions Trophy Tour Updates PoK cities removed from ICC global Trophy Tour
Champions Trophy : भारतापुढे पाकिस्तानने घेतलं नमतं, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नव्या टूरमधून POK वगळलं
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
No one will be able to change constitution of Dr Babasaheb Ambedkar in country says nitin gadkari
गडकरी म्हणतात,‘ डॉ. आंबेडकर यांचे संविधान बदलविण्याचा प्रयत्न…’
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

हेही वाचा : OpenAI च्या सीईओने केले, ‘पुण्याच्या’ प्रफुल्ल धारिवालचे कौतुक! म्हणाले, “GPT-4o हे त्याचे कौशल्य…”

१ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये होणारे बदल पाहा : [Which driving license rules are changing from June 1?]

१. सध्या चालकांना वाहतूक परवाना मिळविण्यासाठी वैयक्तिक प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) जाऊन परीक्षा द्यावी लागते. मात्र, बदल करण्यात येणाऱ्या नियमांनुसार आता अर्जदार हे त्यांच्या पसंतीच्या आणि सर्वात जवळ असणाऱ्या केंद्रावर जाऊन ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकतात. खासगी एजन्सीकडे ड्रायव्हिंग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना देण्यासाठी सरकारकडून प्रमाणपत्रे देण्यात येतील; ज्याच्या मदतीने ते ड्रायव्हिंग परीक्षेचे व्यवस्थापन करू शकतील.

२. वैध परवान्याशिवाय वाहन चालविणाऱ्यांसाठी आता अधिक कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा चालकांना आता तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच, अल्पवयीन चालक पकडला गेल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाऊ शकते. तसेच त्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात येऊ शकते.

३. परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्येदेखील सुलभता आणण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. त्यासाठी अर्जदाराला कोणत्या पद्धतीचा परवाना हवा आहे आणि त्यासाठी त्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याबद्दलची यादी आधीच अर्जदाराला देण्यात येईल.

४. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने साधारण नऊ हजार कालबाह्य झालेली सरकारी वाहने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, इतर वाहनांच्या उत्सर्जनासंबंधीचा तपास करून, आपले महामार्ग पर्यावरणास अधिक अनुकूल करण्याकडे भर देण्यात येणार आहे.

५. असे बदल करण्यात आले असले तरीही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज सबमिट करण्याच्या प्रक्रियेत मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. https://parivahan.gov.in/ या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटच्या मदतीने अर्जदार परवान्यासाठी अर्ज करू शकतात.

हेही वाचा : Googleच्या जेमिनी-AI सह करता येईल ‘जेवणाचे प्लॅनिंग, व्हिडीओवरून शोध’! काय आहेत भन्नाट फीचर्स, पाहा

खासगी ड्रायव्हिंग स्कूलसाठी सुधारित नियम

१. जमिनीची आवश्यकता :

दुचाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान एक एकर जमीन, तर चारचाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी किमान दोन एकर जमीन आवश्यक आहे.

चाचणीद्वारे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश

ड्रायव्हिंग स्कूलने अर्जदारास योग्य त्या चाचणी सुविधेमध्ये प्रवेश देणे आवश्यक आहे.

३. प्रशिक्षकाची पात्रता :

प्रशिक्षकाकडे उच्च माध्यमिक वर्गाचा डिप्लोमा (किंवा त्यासमान शिक्षण) असणे आवश्यक आहे. तसेच, किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक असून, त्याला बायोमेट्रिक्स आणि IT प्रणाली यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

४. प्रशिक्षण कालावधी :

हलकी मोटार वाहने (LMV) : चार आठवड्यांत २९ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे. त्यात आठ तासांचे माहिती आणि २१ तासांचे प्रात्यक्षिक, असे प्रशिक्षण समाविष्ट आहे.
जड मोटार वाहने (HMV) :सहा आठवड्यांत ३८ तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे. त्यामध्ये आठ तासांचे माहिती आणि ३१ तासांचे प्रात्यक्षिक, असे प्रशिक्षण समाविष्ट आहे.

परवान्यासंबंधीच्या शुल्कामधील बदल

  • शिकाऊ परवाना अर्ज ३ : १५० रुपये
  • शिकाऊ परवाना चाचणी शुल्क : ५० रुपये
  • ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क : ३०० रुपये
  • ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे : २०० रुपये
  • आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स : १००० रुपये
  • परवान्यामध्ये दुसऱ्या वाहनाचा वर्ग जोडणे : ५०० रुपये
  • परवान्यांचे नूतनीकरण करणे : २०० रुपये
  • ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण : ३०० रुपये + १००० रुपये
  • ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्शन स्कूलसाठी डुप्लिकेट परवाना जारी करणे : ५,००० रुपये
  • परवाना प्राधिकरणाच्या आदेशांविरुद्ध आवाहन करणे [अपील करणे] : ५०० रुपये
  • परवान्यावरील पत्ता बदलणे : २०० रुपये