इटलीच्या प्रसिद्ध दुचाकी वाहन उत्पादक कंपनी डूकाटी ने भारतीय बाजारात ‘Ducati Multistrada V4 Pikes Peak’ ही आपली दुचाकी लॉन्च केली आहे. ही दुचाकी कंपनीची सर्वाधिक फीचर्स असणारी आणि अधिक स्पोर्टी बाईक आहे.
नव्या दुचाकीचे फीचर्स
या नव्या दुचाकीमध्ये ६.५-इंचाचा TFT डिस्प्ले आहे. या डिस्प्लेवर रायडर मॅप आणि नेव्हिगेशन अॅक्सेस करता येते. कनेक्टिव्हिटीसाठी या दुचाकीमध्ये डुकाटी कनेक्ट सिस्टम देण्यात आली आहे. दुचाकीमध्ये ११५८ सीसी पाॅवरचे इंजिन आहे. या दुचाकीमध्ये ६.५ इंचचा इंस्ट्रुमेंट कंसोल दिला गेला आहे जो स्मार्ट फोनशी जोडला जातो. या नवीन दुचाकीला कंट्रोल आणि स्पीडठी डिझाइन केले गेले आहे. स्पोर्ट्स बाईकप्रमाणे या दुचाकीलाही जबरदस्त लीन अँगल मिळतो.
आणखी वाचा : Keeway SR 125 भारतीय बाजारपेठेत लाँच; किंमत फक्त…
इंजिन
या दुचाकीमध्ये ११५८ सीसी चे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन V4 GrandTurismo आहे. जे युरो-५ अनुरूप इंजिन आहे. हे इंजिन १२५ एनएम च्या पीक टॉर्कसह १७० bhp ची पॉवर जनरेट करते. त्याचबरोबर यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सह ६.५ इंच फुल कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे.
किंमत
भारतात डूकाटी ने आपल्या या नवीन दुचाकीची किंमत ३१.४८ लाख रुपये (एक्स-शोरुम) ठेवली आहे. या दुचाकीचे बुकिंग सुरू झालेले असून कंपनी पुढच्या महिन्यापासून दुचाकीची डिलिव्हरी सुरू करू शकते.