Ducati Monster SP India launch on May 2, 2023: सुपर स्पोर्ट्स बाईक निर्माता डुकाटी ने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतात आपल्या नवीन Ducati Monster SP लाँचची माहिती दिली आहे. कंपनी २ मे रोजी ही बाईक लाँच करेल. २०२३ च्या सुरुवातीलाच कंपनीने या वर्षी आपल्या अनेक बाईक्स सादर करण्याची घोषणा केली आहे.

Ducati Monster SP डिझाइन

या बाईकच्या डिझाईनबद्दल बोलताना, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, LED DRL प्रोजेक्टर-शैलीतील हेडलॅम्प असलेली बाईक, इंधन टाकीवर फ्रंट इंडिकेटर, लाल रंगात स्टेप-अप सीट, बाजूला ट्विन-पॉड एक्झॉस्ट सिस्टम. अन् लाल-काळ्या रंगाची ड्युअल-टोन पेंट योजना देण्यात आली आहे.

book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
Prime Minister Narendra Modis announcement to give guaranteed price of 6 thousand for soybeans
सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग

Ducati Monster SP इंजिन आणि पॉवर

या स्पोर्ट बाईकच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात ९७३cc ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळेल, जे ९२५० rpm वर ११० bhp ची कमाल पॉवर आणि ६५००rpm वर ९३ Nm चा सर्वाधिक टॉर्क देते. इंजिन ६ शी जुळले आहे. स्पीड गिअरबॉक्ससह जोडले गेले आहे. याशिवाय बाईकमध्ये १७-इंच अलॉय व्हील आणि पिरेली डायब्लो रोसो IV टायर देण्यात आले आहेत.

(हे ही वाचा : बाकी कंपन्यांचे उडाले होश, देशात दाखल झाली ५५ हजाराची E-scooter, बुकिंगही सुरू, बॅटरी स्वॅप करुन पळवा नाॅनस्टाॅप )

Ducati Monster SP वैशिष्ट्ये

नवीन डुकाटी Monster SP स्पोर्ट्स बाईकमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात सर्व एलईडी लाइटिंग, मल्टीमीडिया सिस्टमसह ४.३-इंच टीएफटी डिस्प्ले, लॉन्च कंट्रोल, एबीएस कॉर्नरिंग, ३ राइड मोड, ट्रॅक्शन कंट्रोल, व्हील कंट्रोल आणि डुकाटी क्विक शिफ्ट अप /डाउन सारखी अनेक प्रगत वैशिष्ट्ये दिली आहेत.

Ducati Monster SP किंमत

या स्पोर्ट बाईकशी स्पर्धा करणाऱ्या वाहनांमध्ये BMW F 900 XR, Triumph Bonneville Bobber, Kawasaki Ninja 1000, Harley Davidson Iron 883 सारख्या बाईक्सचा समावेश आहे. कंपनी लाँचच्या वेळीच या बाईकच्या किंमतीबद्दल माहिती देईल. पण अंदाजानुसार, कंपनी १५-१६ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीच्या आसपास ऑफर करू शकते.