Upcoming Bike: प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Ducati च्या बाईक जगभरात प्रसिद्ध आहेत. या कंपनीच्या बाईक आपल्या पॉवरफुल इंजिन आणि लूकसाठी पसंद केल्या जातात. अशातच कंपनीने आता या २०२३ वर्षासाठी आपल्या नव्या सुपरबाईकची घोषणा केली आहे. इटालियन सुपरबाईक कंपनी डुकाटीने सांगितले की ती २०२३ मध्ये भारतीय बाजारपेठेत आपल्या नऊ सुपरबाइक सादर करणार आहे, ज्यांची किंमत १०.३९ लाख ते ७२ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे.

‘या’ सुपरबाईक येणार तुमच्या भेटीला

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
What is ‘flying naked’ (2)
Flying naked नवीन ट्रॅव्हल हॅक; तुम्ही हा ट्रेण्ड स्वीकारणार का?

या वर्षी भारतीय रस्त्यावर उतरणाऱ्या मॉडेल्समध्ये Panigale V4 R, Monster SP, DeVille V4, Streetfighter V4 SP2, Multistrada V4 Rally, Scrambler Icon 2G, Scrambler Full Throttle 2G, Scrambler Nightshift 2G आणि Streetfighter V4 Lamborghi चा समावेश आहे.

यातील सर्वात महागडी बाईक Streetfighter V4 Lamborghini असणार आहे, ज्याची किंमत ७२ लाख रुपये असेल. डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्रा म्हणाले की, गेल्या वर्षी कंपनीच्या विक्रीत वाढ १५ टक्के होती आणि तिचा महसूलही गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक होता.

(हे ही वाचा : ‘या’ आलिशान कारची भारतात डिमांड; खरेदीसाठी लोकांनी लावल्या रांगा, झाली ‘रेकॉर्ड ब्रेक’ विक्री )

एक डीलरशिप जानेवारीपासून चंदीगढमध्ये सुरू होईल आणि दुसरी डीलरशिप पहिल्या तिमाहीत अहमदाबादमध्ये सुरू होईल. कंपनीने सांगितले की, दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला मॉन्स्टर एसपी १५.९५ लाख रुपयांच्या अंदाजे किंमतीसह बाजारात सादर केले जाईल, त्यानंतर Panigale V4 R, ज्याची किंमत ६९.९९ लाख रुपये असेल.

देशात दुचाकींची विक्री कमी
देशात कारची विक्री वाढत आहे, तर बाईक आणि स्कूटरच्या विक्रीत घट झाली आहे. हिरो मोटोकॉर्पच्या विक्रीत गेल्या वर्षी किरकोळ घट झाली तर बजाज ऑटोच्या विक्रीत २२ टक्क्यांनी घट झाली. त्याचप्रमाणे TVS मोटरच्या विक्रीतही ३.३ टक्के घट झाली आहे.

Story img Loader