इटालियन बाइक उत्पादक कंपनी डुकाटी १ जानेवारीपासून बाइकच्या दरात वाढ करणार आहे. कंपनीकडुन याची अधिकृत घोषणा करण्यात आली. नव्या किंमती काय असतील याबाबत अजुनही खुलासा करण्यात आला नाही.
१ जानेवारी २०२३ पासून मोटरसायकलच्या सर्व प्रकारांच्या किंमती वाढवण्यात येतील असे ‘डुकाटी इंडिया’ कडुन जाहीर करण्यात आले. बाइकच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या किंमती वाढल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या नव्या दरांबाबत कंपनीद्वारे गेले अनेक दिवस विचार सुरू होता.
आणखी वाचा: सिक्सर किंग ऋतुराज गायकवाड पडला ‘या’ बाईकच्या प्रेमात; खरेदी केली जबरदस्त फीचर्सवाली बाईक
नव्या किंमती बाइकच्या सर्व मॉडेल्स आणि सर्व प्रकारांवर लागू होणार आहेत. नवी दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरु, चेन्नई, कोची, हैद्राबाद, कोलकाता या शहरांमध्ये डिलरशिप उपलब्ध असेल तरीही नव्या किंमती इथे लागू होणार आहेत.