Dukati एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन बाइक्स लॉन्च करत असते. याच डुकाटी कंपनीने भारतात अपडेटेड पॉवर क्रूजर Diavel V4 मोटारसायकल लॉन्च केली आहे. याची किंमत २५.९१ लाख (एक्सशोरूम ) रूपये आहे. याशिवाय कंपनीने बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहची भारतीय बाजारपेठेसाठी नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे.
पहिल्या टप्प्यात डुकाटी कंपनीची नवीन Diavel V4 मोटारसायकल शक्य तितक्या लवकर नवी दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता, अहमदाबाद आणि चंदीगड येथील सर्व डुकाटी स्टोअर्सवर वितरित करणे अपेक्षित आहे. आता आपण या बाइकची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त Financial Express ने दिले आहे.
Ducati Diavel V4: डिझाइन
Diavel V4 ची रचना मागच्या एडिशनपेक्षा व्यावहारिकदृष्ट्या अपरिवर्तित राहते. या नवीन मॉडेलमध्ये फॉरवर्ड सेट फुटपेग्स आणि पॉवर क्रूझरच्या वैशिष्ट्यपूर्ण उंच आणि रुंद हँडलबारसह एक परिचित लो-स्लंग स्टेन्स मिळतो. डुकाटी डुकाटी रेड आणि थ्रिलिंग ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये Diavel V4 ऑफर करत आहे. इतर व्हिज्युअल हायलाइट्समध्ये किंचित सुधारित हेडलॅम्प क्लस्टर, सिंगल-साइड स्विंगआर्म, एका बाजूला क्वाड-टिप एक्झॉस्ट, फ्लोटिंग टेल सेक्शन, मस्क्यूलर 20-लिटर इंधन टाकी, एअर व्हेन्ट्स अशा फीचर्सचा समावेश आहे.
लॉन्चबद्दल भाष्य करताना, डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्रा म्हणाले, ”मी भारतात डुकाटीचा अॅम्बेसेडरच्या रूपात रणवीरचा समावेश करून मी खूप उत्साहित आहे. Diavel V4 ही भागीदारी जाहीर करण्यासाठी योग्य मोटरसायकल आहे कारण Diavel आणि रणवीर दोघेही आपापल्या जगात एक अद्वितीय उपस्थिती दर्शवतात.”
फीचर्स
Diavel V4 मध्ये मिळणाऱ्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास तर यामध्ये फुल एलईडी लाइटिंग, इंस्ट्रुमेंटसाठी ५ इंचाचा TFT डिस्प्ले, डुकाटी लिंक अँपद्वारे ब्लूटूथ इंटिग्रेशन, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, मशीन स्पोक कास्ट अॅल्युमिनियम अलॉय व्हील्स असे फीचर्स मिळणार आहेत. तसेच या बाइकमध्ये IMU इलेक्ट्रॉनिक्स पॅकेजसह लॉन्च केले गेले आहे. ज्यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग ABS, व्हीली कंट्रोल, द्वि-दिशा क्विकशिफ्टर, क्रूझ कंट्रोल आणि पॉवर लॉन्च यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. यामध्ये स्पोर्ट, टुरिंग, वेट आणि अर्बनसह तीन पॉवर मोड आणि चार रायडींग मोड मिळतात.