पुढील आठवड्यात म्हणजेच १४ मार्च रोजी देशभरात रंगांचा सण, होळी साजरी केली जाईल. हा सण एकमेकांना रंग लावून सगळे साजरे करतात. पण, अशा वेळेस लोकांना हे कळत नाही की, नकळत त्यांच्या महागड्या वस्तूंनाही रंग लागले जातात. त्यापैकी सर्वांत सामान्य म्हणजे बाईक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रंग खेळताना लोकांना हे कळत नाही की, त्यांच्यासह त्यांच्या बाईकलाही नकळत रंगपंचमीत सामील व्हावे लागते. अशा परिस्थितीत जर होळीचा रंग तुमच्या बाईकच्या काही भागांवर लागला, तर तो तुमच्या वाहनासाठी हानिकारक ठरू शकतो. रंगांमध्ये असलेली रसायने आणि रंगद्रव्ये बाईकच्या पार्ट्सच्या पृष्ठभागावर चिकटू शकतात आणि काही काळानंतर तिथे गंज पकडून, बाईकचे नुकसान होऊ शकते.

इंजिन आणि त्याचे पार्ट्स

इंजिनाभोवती रंग लागल्याने इंजिनाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. कारण- रंगामधील रसायने इंजिनच्या बाह्य भागांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे गाडीच्या परफॉर्मन्सवरदेखील परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय इंजिन कव्हरवर रंग लागल्याने ते धुणे कठीण होऊ शकते.

डिजिटल कन्सोल आणि बॅटरी

जर बाईकच्या डिजिटल कन्सोल किंवा मीटरला रंग लागला, तर ते नीट काम करीत नाही. बॅटरीच्या आजूबाजूला रंग लागल्याने तिच्या पॉवरवर परिणाम होऊ शकतो आणि शॉर्टसर्किटचा धोका संभवतो.

चेन आणि गीअर

होळीच्या रंगामुळे चेन आणि गीअर्सचे स्नेहन कमी होऊ शकते, ज्यामुळे बाईक चालविताना समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच चेनची सफाई आणि गीअरच्या कार्यक्षमतेवरदेखील परिणाम होऊ शकतो.

ब्रेक आणि हेडलाइट्स

ब्रेकवर रंग पडल्याने ब्रेकच्या कामगिरीवर परिणाम करू शकतो. हेडलाइट्स आणि टेललाइट्सना रंग लागल्याने लाइटची रिअल चमक कमी होऊ शकते, जी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकते.

स्पीडोमीटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक पार्ट्स

स्पीडोमीटर, सिग्नल लाईट इत्यादी इलेक्ट्रॉनिक पार्ट्सना रंग लागल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते आणि ते योग्यरीत्या कार्य करणार नाहीत.

बाईकचा रंग आणि बॉडी

बाईकच्या बाहेरील भागावर रंग लागल्याने बाईकचा रंग खराब होऊ शकतो. जेव्हा होळीचा रंग बाईकवर बराच काळ राहतो, तेव्हा तो फिकट पडू शकतो आणि त्यामुळे बाईकचा रंग खराब होऊ शकतो, ज्यामुळे बाईकचे सौंदर्य कमी होते.