Electric Bikes: अलीकडे देशात इलेक्ट्रिक बाईकची मागणी सातत्याने वाढत आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणामुळे अनेकांचा इलेक्ट्रिक बाईक विकत घेण्याकडे कल वाढत आहे. पण, त्यांनाही इलेक्ट्रिक बाईकमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे, बाईक चार्ज करण्याची योग्य पद्धत आणि इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटरची बॅटरी जास्त चार्ज झाल्यास काय करावे? आज आम्ही या संदर्भातील काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
बॅटरीची कार्यक्षमता कमी होते
इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कूटरची बॅटरी जास्त चार्ज केल्यास, बॅटरीची चार्ज ठेवण्याची क्षमता कमी होते. जेव्हा बॅटरी जास्त चार्ज केली जाते, ज्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. असे केल्याने बॅटरीची कार्यक्षमता कालांतराने कमी होईल आणि ती पूर्वीइतकी जास्त काळ चार्ज राहू शकणार नाही.
सुरक्षेचा धोका
इलेक्ट्रिक बाईक जास्त चार्ज केल्यास सुरक्षिततेचा धोकाही वाढू शकतो. कारण यामुळे बॅटरीचा स्फोट किंवा आग लागू शकते. यामुळे बाईक चालकाला गंभीर दुखापत होऊन दुचाकीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
बॅटरीचे आयुष्य कमी होणे
जास्त चार्जिंग केल्याने बॅटरीचे आयुष्यदेखील कमी होते. यामुळे बॅटरीचे चार्जिंग सायकल बिघडते आणि यामुळे तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. बऱ्याच वेळा अनेक जण असा निष्काळजीपणा करतात आणि नंतर या चुकीसाठी वाहन उत्पादकाला जबाबदार धरतात.
परफॉर्मन्समध्ये घट
बॅटरीच्या ओव्हर चार्जिंगमुळे बाईकच्या कामगिरीवरही त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे वाहनाचा वेग, शक्ती कमी होते. बाईक पूर्वीसारखी परफॉर्मन्स देत नाही आणि रायडरला जास्त वेळा बॅटरी चार्ज करावी लागते.
© IE Online Media Services (P) Ltd