Electric Car New Launch in India: पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या मागणीमुळे आणि प्रदूषणामुळे भारतात इलेक्ट्रिक कारची (Electric Car) मागणी वाढली आहे. यामुळे, पुढील १२ ते १८ महिन्यांत Electric SUV सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स येणार आहेत. आम्ही तुमच्यासाठी Maruti Suzuki, Hyundai, Tata, Mahindra आणि Kia सारख्या कार उत्पादकांच्या आगामी उत्पादनांची यादी आणली आहे.
‘या’ इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लाँच (These Electric Cars will Launch Soon)
Tata Curvv EV
Tata Curvv EV 7 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. ही कार एका चार्जवर ६०० किलोमीटर पेक्षा जास्त रेंज प्रदान करेल अशी अपेक्षा आहे. टाटाच्या पहिल्या मिडसाईज इलेक्ट्रिक SUV कूपमध्ये १२.३- इंच टचस्क्रीन डिस्प्ले, डिजिटल क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, जेश्चर फंक्शनसह पॉवर्ड टेलगेट आणि वेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांसारखे फिचर्स असतील.
Mahindra XUV 3XO EV
या वर्षाच्या अखेरीस महिंद्राने XUV 3XO EV लाँच करणे अपेक्षित आहे आणि Tata Punch EV शी स्पर्धा करण्यासाठी याला XUV 400 च्या खाली ठेवलं जाईलं. यामध्ये बॅटरी पॅकसह XUV 400 बरोबर अनेक समानता केली जाईल. ही कार एका चार्जवर ते सुमारे ३५०-४०० किमीची रेंज ऑफर करेल अशी अपेक्षा आहे.
Maruti Suzuki eVX
२०२५ च्या सुरुवातीला किंवा मध्यंतरी Maruti Suzuki eVX सादर केली जाईल. संकल्पनेप्रमाणे, त्यात ६० kWh बॅटरी पॅक लावला जाऊ शकतो, जो ५५० किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देऊ शकतो. २०२५ च्या उत्तरार्धात टोयोटा सिबलिंग मॉडेल देखील लाँच केले जाईल.
Hyundai Creta EV
अनेकदा टेस्टिंगदरम्यान दिसलेली Hyundai Creta EV पुढल्या वर्षीच्या सुरूवातीला शोरूममध्ये दाखल होईल आणि यात भारतीय बाजारपेठेत बंद झालेली बेस-स्पेक कोना इलेक्ट्रिकची इलेक्ट्रिक मोटर असण्याची शक्यता आहे. त्याची डिझाइन ICE Creta द्वारे प्रेरित असेल. त्याची रेंज ४५० किलोमीटरपेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा आहे.
Mahindra XUV.e8
Mahindra XUV.e8 डिसेंबर २०२४ मध्ये लाँच होऊ शकते. आमचा अंदाज आहे की XUV.e8 पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच २०२५ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. XUV 700 ICE वर आधारित ही इलेक्ट्रिक SUV डिझाईनच्या बाबतीत जवळजवळ कॉन्सेप्टच्याच बरोबरीची असेल. त्याच्या इंटेरियरमध्ये १२.३ इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसह लेव्हल २ ADAS देखील प्रदान केले जाईल.