एरव्ही ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना खूप पसंती देत आहेत. त्या इलेक्ट्रिकवर चालतात आणि मायलेजही चांगला देतात. तसेच इंधनाचे दर वाढल्याने नागरिकांची बचत कमी होत आहे. अशात इलेक्ट्रिक कार ग्राहकांसाठी चांगला पर्याय ठरत आहे. इलेक्ट्रिक कारची विक्री वाढत असताना ऑगस्ट महिन्यात कोणत्या कार कंपनीने सर्वात जास्त इलेक्ट्रिक कारची विक्री केली याबाबत आज आपण जाणून घेऊया.
ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक कारचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहे. केवळ विदेशीच नव्हे तर भारतीय कार कंपन्यांनीही इलेक्ट्रिक कार बाजारात एक मोठे स्थान निर्माण केले आहे. टाटा नेक्सॉन इव्ही ही आधीच बाजारात यशस्वी होत आहे. तर महिंद्रानेही नुकतेच इलेक्ट्रिक एक्सयूव्ही ४०० लाँच केली आहे. ही एक्सयूव्ही २०२३ पासून बाजारात उपलब्ध होईल. दरम्यान ऑगस्ट महिन्यात पुढील ५ कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारची जोरदार विक्री झाली आहे.
या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारची तुफान विक्री
ऑगस्ट २०२२ मध्ये टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार विक्रीत अव्वल स्थान स्थान पटकवले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात २ हजार ७४७ नव्या इलेक्ट्रिक कारची विक्री केली आहे. नेक्सॉन इव्ही प्राइम, इव्ही मॅक्स, टिगोर इव्ही हे मॉडेल्स भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. यात नेक्सॉन इव्ही सिरीज सर्वात अधिक विक्री होणारे वाहन आहे. टाटा टिगोर इव्ही ही देशातील सर्वात स्वस्त पॅसेंजर कार आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये केवळ ५७५ कारची विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा आकडा हा खूप मोठा आहे. टाटा मोटर्सने ३७७.७४ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीचा मार्केट शेअर ८४.८६ टक्के इतका आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ९ टक्क्यांची घट झालेली आहे. मात्र कंपनीच्या कारची विक्री इतरांच्या तुलनेत अधिक आहे.
दुसऱ्या स्थानावर एमजी झेडएस इव्ही आहे. या कारचे ३११ युनिट्सची विक्री झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एमजी झेडएम इव्हीची विक्री १७ टक्क्यांनी घटली आहे. तिसऱ्या क्रमांकावर ह्युंडाइन कोना आहे. ऑगस्ट महिन्यात या कारचे ६९ युनिट्स विकल्या गेले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कारच्या विक्रीत ४७५ टक्क्यांची वाढ झाली आहे. चौथ्या स्थानावर बीवायडी इ६ आहे. या कारच्या ४४ युनिट्सची विक्री झालेली आहे, तर पाचव्या स्थानावरील बीएमडब्ल्यू आयएक्स आणि आय४ च्या २५ युनिट्सची विक्री झाली आहे.
सर्व आकडेवारी पाहता देशात टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहक खूप पसंती देत असल्याचे कळत आहे. इलेक्ट्रिक कार मायलेज चांगला देत असल्याने ते ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. मागणी वाढत असल्याने नवनव्या कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कार आता देशातील कार बाजारात उपलब्ध करत आहे. बीवायडीनेही आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारसह बाजारात प्रवेश केला आहे. येत्या काळात महिंद्रा देखील आपली नवीन इलेक्ट्रिक एक्सयूव्ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करणार आहे. आता ही कार लोकांच्या पसंतीस उतरते का, तसेच ती टाटा मोटर्सला जोरदार आव्हान देणार का हे काळच सांगेल.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)