भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता आणि मागणी झपाट्याने वाढत आहे. या स्पर्धेत आता इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनी बाज बाईक्सनेही प्रवेश केला आहे. कंपनीने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘Baz’ लाँच केली असून, ही स्कूटर ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या निम्म्या किमतीत खरेदी केली जाऊ शकते. या गाडीची किंमत अवघी ३५ हजार रुपये असेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची ओला आणि बजाजसोबत बाजारपेठेत टक्कर होणार आहे. या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहेत स्कूटरची वैशिष्ट्ये?

बाज इलेक्ट्रिक स्कूटर आयआयटी दिल्लीच्या माजी विद्यार्थ्यांनी बनवली असून Baaz Bikes या इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनीने विकसित केली आहे. या स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंगची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे गाडीतील बॅटरी संपल्यानंतर तुम्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवरून बॅटरी बदलून नॉन स्टॉप गाडी चालवण्याचा आनंद लूटू शकणार आहात. या गाडीचा टॉप स्पीड २५ किमी/तास आहे. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज भासणार नाही.

आणखी वाचा : आता तैवानची Gogoro Electric Scooter भारतात लाँच होणार; जाणून घ्या फीचर्स आणि रेंज

स्कूटरची फीचर्स

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंगची सुविधा देण्यात आली असून त्याच्या स्वॅपिंग प्लॅटफॉर्ममध्ये ९ बॅटरी फिक्स केल्या जाऊ शकतात. Baaz इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी बदलण्यासाठी फक्त ९० सेकंद लागतील, असा कंपनीचा दावा आहे. Baaz इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीला अॅल्युमिनियमच्या आवरणात लिथियम-आयन सेल्ससह सुसज्ज पॉड्स देण्यात आले आहेत. यात बसवण्यात आलेल्या बॅटरीचे वजन ८.२ किलो आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला पाऊस आणि धुळीपासून संरक्षण करण्यासाठी ऑल-वेदर IP६५ रेटिंग देण्यात आली आहे.

ही इलेक्ट्रिक स्कूटर वॉटरप्रूफ, स्प्लॅशप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही तर बाज इलेक्ट्रिक स्कूटर आग, पाणी साचणे किंवा इतर कोणतीही दुर्घटना घडल्यास रायडरला सुरक्षिततेचा इशारा देखील देते.

किंमत

Baz Bikes ने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत फक्त ३५,००० रुपये ठेवली आहे. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत ही किंमत निम्म्याहून कमी आहे. अशा परिस्थितीत अतिशय किफायतशीर असल्याने ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना सहज आकर्षित करू शकते.