FY-23 EV Sales Report: भारतात २०२२-२३ या आर्थिक वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत जबरदस्त उडी मारली गेली आहे. SMEV (सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स) च्या ताज्या आकडेवारीनुसार, FY-२३ मध्ये ११,५२,०२१ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली, ज्यात इलेक्ट्रिक दुचाकी, तीन चाकी, चारचाकी आणि बसचा समावेश आहे.

इलेक्ट्रिक टू-व्हीलरची सर्वाधिक विक्री

FY-23 मध्ये विकल्या गेलेल्या इलेक्ट्रिक वाहनांपैकी सर्वाधिक ६२ टक्के दुचाकी वाहनांचा होता. म्हणजे ७,२६,९७६ युनिट्सची विक्री झाली. याशिवाय, यात १,२०,००० लो-स्पीड ई-स्कूटर्स, २,८५,४४३ ई-रिक्षा आणि कमी आणि जास्त गती असलेल्या ५०,००० सायकलींचा समावेश आहे. एकूण विक्री ८,४६,९७६ युनिट्स होती.

Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
Mercedes Benz crosses 2 lakh car sales print eco news
‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर
Mumbai transport department Japan policy
वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार, जपानच्या धर्तीवर नवे धोरण राबविणार
CIDCO announced rates of 26 thousand houses in Navi Mumbai
परवडणारे घर ७४ लाखांचे! सिडकोच्या अल्प उत्पन्न घरांचे दर पाहून अर्जदार अवाक्
Uran gas power plant is producing 300 MW of electricity instead of 672 MW
वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर
residential housing market Mumbai , Knight Frank India,
मुंबई देशातील सर्वात मोठी निवासी घरांची बाजारपेठ! ‘नाइट फ्रँक इंडिया’चा अहवाल जाहीर

इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ

२०१७ मध्ये विकल्या गेलेल्या २७,८८८ युनिट्सपेक्षा ही मोठी उडी आहे. तर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३,२८,००० लाख युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत तिप्पट वाढ झाली आहे. त्याचवेळी, दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची होती, जी ३४ टक्के म्हणजेच ४,०१,८४१ युनिट्स होती. याशिवाय जर आपण चारचाकी वाहनांबद्दल बोललो तर त्यांची विक्री ४ टक्के म्हणजेच ४७,२१७ युनिट्स होती. त्याचवेळी, इलेक्ट्रिक बसेसची विक्री ०.१६ टक्के म्हणजेच १,९०४ युनिट्स इतकी नोंदवली गेली.

(हे ही वाचा : बरीच वर्ष मार्केट गाजवणाऱ्या ‘या’ १४ कार बाजारात दिसणार नाहीत; Maruti, Mahindra कंपन्याचाही समावेश )

FAME2 सब्सिडी सस्पेंशनामुळे विक्री झाली कमी

SMEV च्या मते, स्थानिक मानकांची पूर्तता न करणार्‍या कंपन्यांसाठी FAME2 अंतर्गत ऑटोमोबाईल उद्योगाला दिलेली सबसिडी स्थगित करणे, हे देखील EV विक्रीत घट होण्याचे एक कारण आहे. सणासुदीनंतर इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी कमी होण्याचे कारण म्हणजे ग्राहकांकडून मागणी कमी होणे एवढेच नाही तर अचानक बंद करण्यात आलेले १२०० कोटींहून अधिकचे अनुदान हे ही आहे.

याशिवाय, ४०० प्रीमियम सेगमेंटवर कार्यरत ४०० कोटी OEM देखील रोखण्यात आले कारण हे OEM FAME मानदंड बाजूला ठेवून काम करत आहेत. १६ कंपन्या त्यावर उपाय शोधत आहेत.

FAME2 योजनेमुळे EV विक्री वाढली

SMEV ने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक वाहनांच्या जाहिरातीसाठी FAME2 पूर्वीच्या योजनांमध्ये विशेष फरक नव्हता, तर FAME2 योजना सुरू केल्यानंतर, EVs च्या किमती ३५ टक्क्यांनी कमी झाल्या, ज्यामुळे इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या विक्रीत प्रचंड बदल पाहायला मिळालं आहे.

Story img Loader