गेल्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहन खरेदी वेगाने वाढली आहे. वाढते इंधनाचे दर आणि पर्यावरणपूरक वाहनांचा विचार करता ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. सरकारनेही इलेक्ट्रिक वाहन खरेदीच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. असं असताना मारुती सुझुकीचे प्रमुख आर सी भार्गव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चिंतेत भर पडली आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे पुढील १० ते १५ वर्षे कार्बन उत्सर्जनात अपेक्षित घट होणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. भारताचं दरडोई उत्पन्न युरोप आणि यूएसपेक्षा कमी आहे. तसेच कोळसा हा विजेचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी), बायो-सीएनजी, इथेनॉल आणि हायब्रीड वाहने यांसारख्या पर्यायी तंत्रज्ञानालाही प्रोत्साहन दिले पाहिजे, असे त्यांनी ऑटो इव्ही कॉन्क्लेव्ह २०२२ मध्ये इकोनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितले. सीएनजी, बायो-सीएनजी, इथेनॉल आणि हायब्रीड कारवर चालणाऱ्या कार कमी हरितगृह वायू उत्सर्जित करतात आणि भारताला इंधन आयात कमी करण्यास मदत करू शकतात.
इलेक्ट्रीक वाहनांची विक्री तेजीत असताना मारुतीच्या प्रमुखांचं चिंतेत टाकणारं वक्तव्य, म्हणाले “पुढच्या १० ते १५ वर्षात…”
वाढते इंधनाचे दर आणि पर्यावरणपूरक वाहनांचा विचार करता ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. सरकारनेही इलेक्ट्रिक वाहन खरेदीच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. असं असताना मारुती सुझुकीचे प्रमुख आर सी भार्गव यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-03-2022 at 11:13 IST
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electric vehicles wont give reduction in carbon emissions for the next 10 to 15 years rmt