भारतातील इलेक्ट्रिक टू व्हीलर क्षेत्राचा विस्तार आणि भविष्य पाहता अनेक कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये युएईच्या META4 ग्रुपचा भाग असलेल्या Elysium Automotives मध्ये एक नवीन नाव जोडले गेले आहे.

कंपनीने आपल्या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत सादर केल्या आहेत ज्यात पहिली EVeium Cosmo, दुसरी EVeium Comet आणि तिसरी स्कूटर EVeium Czar आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटर्सची सुरुवातीची किंमत १.४४ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे, जी टॉप व्हेरियंटमध्ये गेल्यास २.१४ लाख रुपये होते.

कंपनी ८ ऑगस्टपासून या तीन इलेक्ट्रिक स्कूटरची प्री-बुकिंग सुरू करणार आहे, ज्यामध्ये ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते बुक करू शकतात. कंपनीने या तीन स्कूटरच्या प्री-बुकिंगसाठी ९९९ रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे.

आणखी वाचा : Hyundai Motors Car Discount: Santro ते i20 पर्यंत या गाड्यांवर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर

जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी या तीन इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरीपासूनची रेंज आणि किंमत आणि फीचर्सची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

EVeium Cosmo: या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने २.१६ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक बसवला आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ८० किमीची रेंज देईल. या रेंजसह ६५ किमी प्रतितास या टॉप स्पीडचाही दावा करण्यात आला आहे.

कंपनीने सहा रंगांच्या थीमसह ही इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे ज्यात ब्लू, ग्रे, ब्राइट ब्लॅक, चेरी रेड, लेमन यलो आणि व्हाईट कलरचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत १.४४ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

आणखी वाचा : Top 3 Best Mileage Sedan: या टॉप ३ सेडान ६ लाखांच्या बजेटमध्ये २३ kmpl पर्यंत मायलेज देतात

EVeium Comet: कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ३.६ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. या स्कूटरच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर १५० किमीपर्यंतची रेंज देते. या रेंजसह ८५ किमी प्रतितास या टॉप स्पीडचा दावा करण्यात आला आहे.

कंपनीने रॉयल ब्लू, पीच, व्हाईट, वाईन रेड, मॅट ब्लॅक आणि शाइन ब्लॅक या सहा रंगांच्या थीमसह स्कूटर सादर केली आहे. कंपनीने या स्कूटरची सुरुवातीची किंमत १.९२ लाख रुपये इतकी ठेवली आहे.

EVeium Czar: या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने ३.०२ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक बसवला आहे. या स्कूटरच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर १५० किमीची रेंज देते.

स्कूटर सहा रंगांच्या ऑप्शनसह ऑफर करण्यात आली आहे ज्यामध्ये पहिला रंग पांढरा, दुसरा ग्लॉसी ब्लॅक, तिसरा मॅट ब्लॅक, चौथा ग्लॉसी रेड, पाचवा हलका निळा आणि सहावा रंग मिंट ग्रीन आहे. कंपनीने या स्कूटरची सुरुवातीची किंमत २.१४ लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे.