जगभरात टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची चर्चा आहे. गाडीतील वैशिष्ट्यांमुळे कारप्रेमींचा खरेदी करण्याकडे ओढा वाढला आहे. त्याचबरोबर कंपनीचे सीईओ एलोन मस्क सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मात्र यावेळी एलन मस्क यांच्या भावूक स्वभावाची चर्चा होत आहे. मस्क यांनी २०१८ मध्ये टेस्ला कार अपघातात मृत्यू पावलेल्या बॅरेट रिलेचे वडील जेम्स रिले यांना भावनिक ई-मेल लिहिला होता. यामध्ये त्यांनी आजवर लोकांना माहीत नसलेलं दु:ख मांडलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१८ मध्ये टेस्ला कार अपघाताची घटना घडली होती. या अपघातात जेम्स रिले यांचा मुलगा बॅरेट रिले याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा टेस्ला मॉडेल एस ११६ किमी प्रतितास वेगाने चालवत असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ८ मे २०१८ रोजी फ्लोरीडा येथील फोर्ट लॉर्डडेल येथे घराच्या भिंतीवर गाडी आदळली. अपघातानंतर लगेचच कारने पेट घेतला आणि त्या अपघातात रिले आणि त्याचा मित्र जागीच मरण पावला. या अपघातानंतर २४ तासांनंतर एलोन मस्कने बॅरेट रिलेचे वडील जेम्स रिले यांना ई-मेल पाठवला होता. या ईमेलमध्ये शोक व्यक्त करत रिले यांना विचारले होते की, ‘काही बोलायचे आहे का?’. जेम्स रिले यांनी मस्क यांना उत्तर दिले, ‘पोरगा गमावण्यापेक्षा वाईट काहीही नाही.’ जेम्सने असेही सांगितले की, त्याला मस्कची ऑफर स्वीकारायची होती. पण त्यानंतर त्यांी एलोन मस्कला हे सांगण्यासाठी ई-मेल केला की, ते आणि त्यांची पत्नी बोलण्यास तयार नाहीत. एलोन मस्क यांनी रिलेच्या विनंतीचे पालन केले. त्यांनी टेस्लामध्ये एक नवीन प्रोग्राम जोडला असून याच्या मदतीने पालक टेस्ला कारचा वेग नियंत्रित करू शकतात. या संदर्भात, टेस्लाने जून २०१८ मध्ये एक सॉफ्टवेअर अपग्रेड केले. स्मार्टफोन किंवा यूजर इंटरफेसच्या मदतीने कारचा वेग ताशी ५० ते ९० किमीपर्यंत सेट केला जाऊ शकतो.

“…असा निर्णय घेणं मूर्खपणाचं ठरलं”, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांची कबुली

जेम्स रिलेच्या ई-मेलला उत्तर देताना एलोन मस्कने लिहिले, ‘मी समजू शकतो. माझा पहिला मुलगा माझ्या कुशीत मरण पावला आहे. मला त्याच्या हृदयाचा शेवटचा ठोका अनुभवला आहे.’ एलोन मस्क यांनी या ई-मेलमध्ये त्यांचा मोठा मुलगा नेवाडा अलेक्झांडर मस्कचा उल्लेख केला होता. त्याचा मृत्यू अवघ्या १० आठवड्यांचा असताना झाला होता. नुकत्याच झालेल्या न्यायालयीन कामकाजादरम्यान हा ई-मेल उघड झाला. ई-मेलनंतर जवळपास दोन वर्षांनंतर रिलेने फ्लोरिडा येथील फेडरल कोर्टात टेस्लाविरुद्ध एक खटला दाखल केला. ज्यामध्ये एलोन मस्कच्या टेस्ला कारमधील लिथियम-आयन बॅटरीला अपघातानंतर लगेच आग लागली आणि परिस्थिती अनियंत्रित झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. रिले विरुद्ध टेस्ला प्रकरणाची सुनावणी यावर्षी होणार आहे. टेस्लाच्या ऑटोपायलट असिस्टेड ड्रायव्हिंग सिस्टमबद्दल साक्ष देण्यासाठी या खटल्यातील वकील मस्कला कोर्टात बोलावण्याचा प्रयत्न करीत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk email tesla crash victim in 2018 says about incident rmt