EMotorad कंपनीने अधिकृतरीत्या भारतात प्रिमीयम आणि इकॉनॉमिकल ई-बाईकचे लाँचिंग केले आहे. या ई- बाईकमध्ये loT आणि नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. ही पूर्णतः मेड इन इंडिया बाईक आहे. या सिरीजमध्ये Nighthawk, Desert Eagle आणि Xplorer+ यांचा समावेश आहे. एक्स फॅक्टर आणि प्रीमियम रेंजमध्ये या बाईक उपलब्ध आहेत. EMotorad e-bikes ची एलिट ही सिरीज भारतात लाँच करण्यात आलेली सर्वात महागडी रेंज आहे. यामध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी देण्यात आलेली आहे. या ई-बाईकमध्ये योग्य अ‍ॅक्च्युएशन टेक्नॉलॉजी असून यामुळे स्लोप व शिफ्टिंग व्हेरिएशन होत नाही.

हेही वाचा : मारुती सुझुकीची ‘ही’ कार आता विदेशात घालणार धुमाकूळ; परदेशात होणार एक्सपोर्ट

Warivo CRX Electric Scooter Price Feature
Warivo CRX Electric Scooter: गुरुग्राम कंपनी Warivo ने लाँच केली हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर CRX; पाहा किंमत आणि फीचर्स
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
mmrda to start pod taxi service in bandra kurla complex
 ‘पॉड टॅक्सी’च्या निविदेत हैदराबाद येथील कंपनीची बाजी
Air India
Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?
How to update Aadhaar online
Aadhaar Card Update : आधार कार्डमधील कोणती माहिती घरबसल्या करता येते अपडेट? ‘ही’ पाहा लिस्ट अन् मोफत करा ‘या’ तारखेपूर्वी आधार कार्ड अपडेट
Airtel partnered with Apple to offer Apple TV+ and Apple Music
Airtel Partnered With Apple : एअरटेल ऑफर करणार Apple TV+ Apple Music; ॲपलबरोबरच्या पार्टनरशिपचा कसा होणार युजर्सना फायदा?
Franklin Templeton India Asset Management Company Independent Director Pradeep Shah
बाजारातली माणसं – असा असावा स्वतंत्र संचालक! प्रदीप शहा
successful bid by Central Bank for insurance business of Future
‘फ्युचर’च्या विमा व्यवसायासाठी सेंट्रल बँकेकडून यशस्वी बोली

काय आहेत फीचर्स ?

या ई- बाईकमध्ये मजबूत अशी अ‍ॅल्युमिनियम फ्रेम, टेक्ट्रो 2 पिस्टन फ्रंट आणि रियर ब्रेक, मॅक्सिस मिनियन डीएचएफ एक्सो प्रोटेक्शन ट्यूबलेस टायर तसेच १५० मिमीचे ट्रॅव्हल फोर्क आणि एसआरएएम शिफ्टिंग अशा प्रकारचे फीचर्स यामध्ये बघायला मिळतात. डेझर्ट ईगल मध्ये १२० मिमी ट्रॅव्हल फोर्कने सुसज्ज आहे. यामध्ये स्पीड कंट्रोल करण्यासाठी प्रोव्हन मोशन कंट्रोल हे फिचर येते. यामध्ये Kenda Juggernaut टायर येतात.

ई-बाइकच्या एक्स-फॅक्टर या रेंजमध्ये डिटेचेबल बॅटरी , एलसीडी , स्टील फ्रेम्स तसेच डिस्क ब्रेक येतात. यामध्ये X1 ला 12 मॅग्नेटसह 1 लेव्हल पेडलचा सपोर्ट मिळतो. यामध्ये अजून काही फीचर्स येतात. जसे की, हार्ट रेट मोजणे, किलोमीटर, नेव्हिगेशनसाठी जीपीएस तसेच जिओ ट्रॅकिंगच्या फीचरचा वापर वापरकर्ते करू शकतात. ई-बाईक लवकरच वापकर्त्यांसाठी E Motorad च्या अधिकृत वेबसाइट, ऑनलाइन मार्केटप्लेस आणि ऑफलाइन डीलरशिपवरून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा : लोकप्रिय Tata Motors ची ‘ही’ कार १ लाख रुपयांच्या डाउनपेमेंटवर घरी न्या, भरा ‘इतका’ EMI

किती असणार किंमत ?

EMotorad कंपनीने अधिकृतरीत्या भारतात प्रिमीयम आणि इकॉनॉमिकल ई-बाईकचे लाँचिंग केले आहे. कंपनीने या बाईकच्या किंमती देखील जाहीर केल्या आहेत. एक्स फॅक्टर असलेल्या बाईकची किंमत ही २४,९९९ रुपये आहे तर, प्रीमियम रेंजमधील बाईकची किंमत ही ४,७५००० रुपये आहे.