ईव्ही स्टार्टअप अल्ट्राव्हायोलेटने दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक ‘Ultraviolette F77’ लाँच केली आहे. कंपनीने या बाइकचे तीन व्हेरियंट बाजारात आणले आहेत. कंपनीने या बाइकसाठी बुकिंग विंडो उघडली अन् ऑनलाइन बुकिंग विंडो उघडल्यानंतर अवघ्या दोन तासांतच लिमिटेड एडिशन अल्ट्राव्हायोलेट F77 देशात विकली गेली. म्हणजेच या इलेक्ट्रिक बाईकची सर्व युनिट्स अवघ्या १२० मिनिटांत विकली गेली आहेत. जानेवारी २०२३ मध्ये बेंगळुरू येथून या बाइकची डिलिव्हरी सुरू होणार आहे.
Ultraviolette F77 तीन प्रकारांत लाँच
Ultraviolette ने ज्या तीन प्रकारांसह ही बाईक लॉन्च केली आहे, त्यात पहिला प्रकार Airstrike, दुसरा प्रकार Laser आणि तिसरा प्रकार Shadow आहे. Ultraviolette F77 बाइकसोबत विविध अॅक्सेसरीजही देण्यात येणार आहेत. यात पोर्टेबल फास्ट चार्जर, स्टँडर्ड चार्जर, व्हील कॅप, होम चार्जिंग पॉड, क्रॅश गार्ड, पॅनियर आणि व्हिझर असेल. अल्ट्राव्हायोलेट F77 ड्युअल-चॅनल ABS, अॅडजस्टेबल सस्पेंशन, मल्टिपल ड्राइव्ह मोड्स आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारख्या फीचर्ससह येईल. एक टीएफटी स्क्रीन असेल आणि रायडरला विविध माहिती दाखवेल.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, F77 चे स्टँडर्ड आणि रेकॉन दोन्ही प्रकार ३८.८ bhp पॉवर आणि ९५ Nm टॉर्क जनरेट करतात. त्यांचा टॉप स्पीड १४७ किमी प्रतितास आहे आणि ते तीन रायडिंग मोड्ससह येतात, ज्यात ग्लाइड, कॉम्बॅट आणि ब्लास्टिक यांचा समावेश आहे. बाईक ७.१ kWh आणि १०.३ kWh सह दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह ऑफर केली आहे, जे अनुक्रमे २०६ किमी आणि ३०७ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज (IDC) देतात.
जानेवारी २०२३ पासून वितरण
कंपनीने ३.८० लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीसह बाजारात लॉन्च केली आहे. कंपनी जानेवारी २०२३ पासून बेंगळुरूमध्ये या बाइकची डिलिव्हरी सुरू करेल. इतर शहरांमध्ये हळूहळू डिलिव्हरी सुरू होईल.