Electric Vehicle Charging: जगभरात आता इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. भारतातही इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली आहे. देशात अनेकांना इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचं आहे. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारं चार्जिंग स्टेशन सध्या देशात कमी असल्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक कार कुठे चार्ज करायची या टेन्शनमुळे ई-कार खरेदी करत नाहीत. तसेच चार्जिंग टाईम ही एक मोठी समस्या आहे. पण आता तुमच्यासाठी असे अॅप लाँच करण्यात आले आहे जे तुम्हाला तुमच्या जवळ कोणते चार्जिंग स्टेशन आहे हे सांगेल.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले ‘हे’ अॅप लाँच
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीत आयोजित राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन समारंभात लाँच ‘EV Yatra’ नावाचे अॅप नुकतेच लाँच करण्यात आले. EV Yatra नावाच्या या अॅपला अॅप्लिकेशन ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने विकसित केले आहे. या अॅप्लिकेशनच्या मदतीने चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणासह इतर अनेक माहिती इलेक्ट्रिक कारच्या मालकांना उपलब्ध होणार आहे. चला तर जाणून घेऊया या अॅपचा तुम्हाला कसा फायदा होईल व हे अॅप कसे काम करेल.
(आणखी वाचा : जुन्या टू-व्हीलरचं आता नो टेन्शन! ‘इतक्या’ कमी खर्चात EV मध्ये होणार कन्वर्ट; जाणून घ्या कसं?)
‘EV Yatra अॅप कसे कार्य करेल
१. EV Yatra हे अॅप प्लेस्टोअर आणि अॅप स्टोअर दोन्हीवर उपलब्ध आहे.
२. ते डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात स्वतःची नोंदणी करावी लागेल.
३. यासाठी तुमच्या वाहनाची माहिती, नोंदणी क्रमांक, विमा पॉलिसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स यासारखी कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
४. तसेच, तुम्ही हे अॅप तुमच्या डिजी लॉकरशी कनेक्ट करण्यातही सक्षम व्हाल.
५. हे अॅप हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांना सपोर्ट करेल.
(आणखी वाचा : Second Hand Car खरेदीचा विचार करताय? ‘हे’ जबरदस्त फायदे जाणून घ्या, नवीन कार खरेदीचा विचारही करणार नाही!)
EV Yatra अॅपचे फायदे कोणते?
१. या अॅपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चार्जिंग स्टेशनचे लोकेशन तुम्हाला मिळणे हा आहे.
२. चार्जिंग स्टेशनवर कोणते चार्जर बसवले जातात, याची माहिती मिळेल.
३. चार्जिंगसाठी किती पैसे द्यावे लागतील, हे तुम्हाला माहित होणार.
४. ईव्हीच्या सेवेशी संबंधित माहिती तुम्हाला मिळेल.
५. तुम्ही या अॅपद्वारे चार्जिंग स्लॉट प्री-बुकही करू शकता.
विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सतत नवीन धोरणे आणि योजना आणत आहे. त्याचबरोबर शहरांमध्ये तसेच महामार्गांवर चार्जिंग स्टेशन वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आगामी काळात चार्जिंग स्टेशनच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. यासोबतच सरकार ई-चार्जिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी नवीन योजनांवर काम करत आहे. विद्युत महामार्गाबाबतही सातत्याने काम सुरू आहे.