Evolet Pony Electric Scooter: Evolet Pony इलेक्ट्रिक स्कूटर देशातील वाहन बाजारात खूप लोकप्रिय आहे. लोकांना त्याचा आकर्षक लुक आणि कमी किंमत आवडते. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये शक्तिशाली बॅटरी पॅकसह अनेक आधुनिक वैशिष्ट्ये प्रदान करते. तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची तयारी करत असाल तर. तर तुम्हाला ही स्कूटर फक्त २ हजारात खरेदी करता येणार आहे.
Evolet Pony इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरी
कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये BLSD तंत्रज्ञानावर आधारित २५०-वॅट पॉवरची इलेक्ट्रिक मोटर प्रदान करते. यासोबत तुम्हाला १.४KWH क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळेल. या इलेक्ट्रिक स्कूटरचा बॅटरी पॅक सामान्य चार्जरच्या मदतीने केवळ ३ ते ४ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकतो.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बसवलेल्या बॅटरी पॅकवर तुम्हाला ३ वर्षांची वॉरंटीही मिळत आहे. त्याचवेळी, कंपनी तिच्या इलेक्ट्रिक मोटरवर १ वर्ष ते ६ महिन्यांची वॉरंटी देखील देते.
(हे ही वाचा : डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला गती देण्यासाठी जग्वार लँड रोव्हरने केली ‘या’ मोठ्या कंपनीशी हातमिळवणी)
Evolet Pony इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज
दुसरीकडे, या इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजबद्दल सांगायचे तर, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर ८० किमीपर्यंत धावू शकते. यासोबतच या स्कूटरच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
या स्कूटरमध्ये कंपनीने अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर दिले आहेत. या स्कूटरमध्ये पुढील बाजूस हायड्रोलिक सस्पेन्शन असलेली सस्पेन्शन सिस्टीम आणि मागील बाजूस ड्युअल तंत्रज्ञानासह डबल शॉकर देखील उपलब्ध आहे.
Evolet Pony इलेक्ट्रिक स्कूटर वैशिष्ट्ये
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, यूएसबी चार्जिंग पॉइंट, डिजिटल ट्रिप मीटर, ई-एबीएस, एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाईट, मोबाइल अॅप्लिकेशन, पास स्विच, लो बॅटरी इंडिकेटर आणि एलईडी टर्न सिग्नल लॅम्प ही वैशिष्ट्ये आहेत.
(हे ही वाचा : Mahindra Thar पासून Bolero पर्यंत ‘या’ कारवर मिळतोय तगडा डिस्काउंट, होणार बंपर बचत! )
Evolet Pony इलेक्ट्रिक स्कूटर फायनान्स प्लॅन
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने याला ५७,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत बाजारात आणले आहे. तुम्ही ते २,१११ च्या सहज EMI वर खरेदी करू शकता.