FASTag annual pass VS FASTag recharge: देशात फास्टॅगबाबत एक नवीन नियम लागू होणार आहे. भारत सरकार फास्टॅगसाठी अ‍ॅन्यूएल टोल पास सुरू करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून फास्टॅग पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही. यासाठी, तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी एकदा ३,००० रुपये जमा करावे लागतील, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही एक्सप्रेस वे किंवा राष्ट्रीय महामार्गावर एका वर्षासाठी कोणताही टोल भरावा लागणार नाही. हा नियम फक्त प्रायव्हेट गाड्यांसाठीच लागू करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

FASTag टोल पासची किंमत किती असेल?

सरकार वार्षिक आणि लाइफटाइम टोल पास सुरू करण्याचा विचार करत आहे. वार्षिक पाससाठी लोकांना फक्त ३,००० रुपये द्यावे लागतील. आणि लाइफटाइम टोल पास मिळविण्यासाठी, ३०,००० रुपये एकावेळी भरावे लागतील, यासह लोकांना १५ वर्षांसाठी टोल पासही मिळेल.

एकवेळच्या टोल भाड्यात किमान २०० रुपये कापले जातात किंवा जर तुम्ही लांबच्या प्रवासाला गेलात तर ७००-८०० रुपयेही टोलमध्ये कापले जातात. वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी टोलचे भाडे खूपच महाग आहे. जर नवीन नियम लागू झाला, तर फक्त ३,००० रुपयांच्या टोल पाससह, हे लोक कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावर किंवा एक्सप्रेस वेवर प्रवास करू शकतील.

फास्टॅगचे हे नियम लागू झाल्यानंतर, जे लोक वर्षातून फक्त एक किंवा दोनदा आपल्या वैयक्तिक वाहनाने प्रवास करतात त्यांना याचा लाभ मिळणार नाही. वर्षभरासाठी तीन हजार रुपयांचा टोल पास घेणे त्यांना महागात पडणार आहे. असे लोक FASTag कार्ड रिचार्ज करून टोल ओलांडू शकतात.

सरकारला काय फायदा होणार?

फास्टॅगचा हा नियम आल्यानंतर सरकारला टोल कनेक्शन घेणे सोपे होणार आहे. यासोबतच टोलनाक्यावरील वाहनांच्या लांबच लांब रांगांपासून नागरिकांची सुटका होणार आहे. त्याच वेळी, लाइफटाइम टोल पास घेतल्यानंतर लोकांना टोल प्लाझावर कधीही कर भरण्याची गरज भासणार नाही.