Fastag New Rules : एखाद्या लाँग रूटवर कार चालविण्याची मजा काही वेगळीच असते. पण, आता जर तुमच्या कारवर फास्टटॅग लावला गेला नसेल, तर हीच मजा सजा बनू शकते. जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुम्हाला फास्टॅगबद्दल माहिती असेल; पण एनपीसीआयने फास्टॅगबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हे नियम आधीपासून लागू असले तरी ऑक्टोबरमध्ये फास्टॅगच्या केवायसीबाबतचा नियम नवीन आहे आणि १ ऑगस्टपासून त्याचे पालन करावे लागेल. गर्दी कमी करण्यासाठी आणि राष्ट्रीय रस्ते मार्गावरील कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन नियम लागू केले जातील. या नियमांचे उल्लंघन केल्यास तुमचा फास्टॅग ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाईल. आपण अनेकदा पाहतो की, अनेक वाहनांवर फास्टॅग नसतो किंवा तो व्यवस्थित लावला जात नाही. त्यामुळे मशीनला तो नीट स्कॅन करता येत नाही. परिणामी टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या कारला फास्टटॅग लावणे अनिवार्य आहे.

एनपीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फास्टॅग सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत पाच आणि तीन वर्षांच्या सर्व फास्टॅगचे केवायसी असणे आवश्यक आहे. लेटेस्ट अपडेट असे आहे की, कंपन्यांनी केवायसीसाठी १ ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू करणे क्रमप्राप्त आहे.

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?

मोबाईल नंबर लिंक करा

१ एप्रिलपासून ‘एक फास्टॅग, एक वाहन’ अनिवार्य झाले आहे. सर्व फास्टॅग वापरकर्त्यांनी वाहनाचा नोंदणी क्रमांक (VRN), चेसिस क्रमांक फास्टॅगशी जोडणे आवश्यक आहे. ज्यांनी अलीकडेच वाहन खरेदी केले आहे, त्यांनी खरेदी केल्यानंतर ९० दिवसांच्या आत फास्टॅगवर नोंदणी क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.

डेटाबेस पडताळणी

फास्टॅग प्रदान करणाऱ्या कंपन्यांच्या डेटाबेसची पडताळणी केली जाणे आवश्यक आहे. सर्व डेटा अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करण्यासाठी ही पडताळणी प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे.

हेही वाचा >> Ola Electric Bike: अखेर प्रतीक्षा संपली! ओला स्कूटरनंतर आता येणार ओला इलेक्ट्रिक बाईक; १५ ऑगस्टला होणार का लाँच?

फोटो अपलोड आवश्यकता

गैरवापर टाळण्यासाठी आणि फास्टॅगशी संबंधित वाहन योग्यरीत्या ओळखले गेले आहे याची खात्री करण्यासाठी वाहनाचे स्पष्ट दिसणारे फोटो अपलोड केले जाणे आवश्यक आहे. कारचा बाजूचा व समोरचा, तसेच कारवर चिकटवलेल्या फास्टॅगचा फोटो स्पष्ट दिसावा. पाच वर्षे जुना फास्टॅग बदलावा लागेल.

मोबाईल नंबर लिंकिंग

प्रत्येक फास्टॅग वाहनमालकाच्या मोबाईल नंबरशी जोडलेला असणे आवश्यक आहे. फास्टॅग प्रदाते आणि वापरकर्ते यांच्यात अधिक चांगला संवाद साधण्याच्या उद्देशाने या गोष्टीची आवश्यकता आहे. वापरकर्त्यांनी त्यांच्या कारच्या फास्टॅग स्थितीबद्दलच्या सूचना वेळेवर मिळतायत ना याची खात्री करून घ्यावी.