Fastag New Rules : एखाद्या लाँग रूटवर कार चालविण्याची मजा काही वेगळीच असते. पण, आता जर तुमच्या कारवर फास्टटॅग लावला गेला नसेल, तर हीच मजा सजा बनू शकते. जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुम्हाला फास्टॅगबद्दल माहिती असेल; पण एनपीसीआयने फास्टॅगबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हे नियम आधीपासून लागू असले तरी ऑक्टोबरमध्ये फास्टॅगच्या केवायसीबाबतचा नियम नवीन आहे आणि १ ऑगस्टपासून त्याचे पालन करावे लागेल. गर्दी कमी करण्यासाठी आणि राष्ट्रीय रस्ते मार्गावरील कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवीन नियम लागू केले जातील. या नियमांचे उल्लंघन केल्यास तुमचा फास्टॅग ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाईल. आपण अनेकदा पाहतो की, अनेक वाहनांवर फास्टॅग नसतो किंवा तो व्यवस्थित लावला जात नाही. त्यामुळे मशीनला तो नीट स्कॅन करता येत नाही. परिणामी टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या कारला फास्टटॅग लावणे अनिवार्य आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा