जपानी ऑटोमेकर कंपनी टोयोटाची वाहनं देशात मोठ्या प्रमाणात पसंत केल्या जातात. टोयोटाची एसयूव्ही वाहने जगभरात लोकप्रिय आहेत. टोयोटा मोटर्स बाजारपेठेत आपले नवनवे माॅडेल्स लाँच करीत असते. आता अलीकडेच टोयोटा मोटर्सने बाजारात दाखल केलेल्या एका एसयूव्ही कारवर ग्राहकांचं प्रेम दिसून येत आहे. या कारला बाजारात मोठी मागणी असून विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. या कारचा पहिला लॉट बुकिंग सुरू झाल्यापासून अर्ध्या तासात पूर्णपणे विकला गेला. या लॉटमध्ये कंपनीने १ हजार गाड्यांचे बुकिंग सुरू केले होते ज्या पूर्णपणे विकल्या गेल्या असल्याची माहिती आहे.
टोयोटाच्या या कारच्या पॉवरफुल इंजिन आणि उत्कृष्ट ऑफरोडिंग क्षमतेमुळे या कारला मोठी पसंती मिळत आहे. या SUV मध्ये मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, प्लश लेदर अपहोल्स्ट्री आणि रॅपराउंड डिजिटल डिस्प्लेसह लेटेस्ट जेनरेशनची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. कंपनीनं आपली केबिन अॅडव्हान्स करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही.
टोयोटाच्या नवीन पिढीतील 2024 Toyota Land Cruiser कारला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने काही देशांमध्ये बुकिंग घेणे सुरू केले आहे. टोयोटाने २१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता नवीन पिढीच्या लँड क्रूझरच्या पहिल्या लॉटचे बुकिंग जर्मनीमध्ये सुरू केले. परंतु लॉटमध्ये उपस्थित असलेल्या १ हजार कार अर्ध्या तासात विकल्या गेल्या ज्यामुळे कंपनीला बुकिंग थांबवावे लागले. आता या कारसाठी ग्राहकांची प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे. टोयोटाची नवीन लँड क्रूझर TNGA-F आर्किटेक्चरवर आधारित आहे जी जुन्या मॉडेलपेक्षा ५० टक्के अधिक कार्यक्षम मानली जाते.
(हे ही वाचा : Bullet सोडून लोकं ‘या’ बाईकच्या लागले मागे, होतेय धडाधड विक्री, किमतही कमी, मायलेज…)
टोयोटाने आपलं नवी लँड क्रूझर कॉस्मेटिक बदलांसह अपडेट केलं आहे. नवीन राउंड शेप हेडलॅम्प, नवीन ग्रिल डिझाइन आणि नवीन टोयोटा बॅजिंगसह पूर्णपणे नवीन फ्रंट स्टाइल मिळते. पारंपारिक पेट्रोल इंजिनाऐवजी, नवीन ७० मालिका २.८-लिटर १GD टर्बो डिझेल इंजिन पॉवरट्रेनसह येतं, ज्याबाबत कंपनीचा दावा आहे की, ते शक्तिशाली असून कमी आवाज करतं. हे इंजिन २०४ PS पॉवर आणि ५०० Nm टॉर्क जनरेट करते. टोयोटा २०२५ पर्यंत हायब्रिड इंजिनमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. टोयोटा लँड क्रूझर जर्मन बाजारपेठेत एक्झिक्युटिव्ह, टेक आणि फर्स्ट अॅडिशन अशा तीन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने भारतातही लँड क्रूझरचे बुकिंग तात्पुरते थांबवले असून भारतात या कारची किंमत २.१० कोटी (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.