सध्या देशभरात Ev बाइक्स खरेदी करण्यावर लोकांचा जास्त भर आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या EV कार्स, बाईक्स आणि स्कूटर भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करत आहेत. आता आणखी एक इलेक्ट्रिक टू व्हिलर लॉन्च झाली आहे. बंगळुरू मधील इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्टअप River ने लॉन्च केली आहे. ही स्कूटर देशातील पहिली एसयूव्ही स्कूटर असल्याचा कंपनीचा दावा आहे. या स्कूटरला Indie e-scooter असे नाव देण्यात आला आहे.

इंडी ई-स्कूटर चे फिचर्स

या स्टार्टअप कंपनीचा असा दावा आहे की, या इंडी -ई स्कूटरमध्ये एकूण ५५ लिटरची टाकी असून ज्यामध्ये ४३ लिटर बूस्ट स्पेस आणि १२ लिटर ग्लोव्ह सेप्सचा समावेश करण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये अशा इतर अनेक गोष्टी आहेत ज्या अन्य EV स्कूटरमध्ये आढळून येत नाही.

yavatmal persons set fire to Bipin Choudharys car on Friday midnight
खळबळजनक! पेट्रोल टाकून उमेदवाराचे वाहनच पेटविले…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
pune officers without helmet no entry
पुणे: सावधान ! महापालिकेच्या इमारतीमध्ये हेल्मेट शिवाय प्रवेश कराल तर…!
Raigad Chi Waghin | Viral Video
VIDEO : रायगडची वाघीन! शिवप्रेमीची दुचाकी एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…

हेही वाचा : Upcoming Hyundai Cars 2023: Hyundai Verna पासून Stargazer MPV पर्यंत ह्युंदाई लॉन्च करणार ‘या’ पाच कार्स

या स्कूटरमध्ये कंपनीने ६.७ KW पॉवर इलेक्ट्रिक मोटरसह ४ KW क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही स्कूटर ५ तासांमध्ये ० ते ८० टक्के चार्ज होऊ शकते असा कंपनीचा दावा केला आहे. तसेच या स्कूटरमध्ये १२० किमी इतके मायलेज वापरकर्त्यांना मिळणार असून याचा प्रतितास वेग हा ९० किमी इतका असल्याचा देखील कंपनीने दावा केला आहे. यामध्ये इको , दुसरी राईड आणि रश मोड असे तीन मोड यामध्ये देण्यात आले आहेत. इंडी ई-स्कूटरमध्ये १४ इंचाची चाके देण्यात आली आहेत. तसेच ही स्कूटर २०० किलो इतके वजन देखील उचलू शकते असा कंपनीचा दावा आहे.

इंडी ई-स्कूटरची किंमत

स्टार्टअप कंपनीने RIVER ने इंडी ई-स्कूटरची सुरुवातीची किंमत ही १,२५,००० रुपये इतकी आहे. या स्कूटरचे डिझाईन वेगवेगळ्या प्रकारच्या चालकांना समर्थन देण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहे. ऑगस्ट २०२३ पासून या स्कूटरचे वितरण सुरु होण्याची शक्यता आहे.