Innova HyCross Specifications : टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने काही दिवसांपूर्वी त्यांच्या इनोव्हा हायक्रॉस एसयूव्हीचा टिझर प्रदर्शित केला होता. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर या नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये भन्नाट फिचर्स असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर टोयोटा कंपनीने भारतात इनोव्हा हायक्रॉस कार लॉंच केली. १८.३० लाख एव्हढी एक्स शोरुम किंमत असलेल्या या कारमध्ये पाच जबरदस्त फिचर्स आहेत. विशेष म्हणजे आधीच्या इनोव्हा क्रिस्टामध्ये हे फिचर्स नसल्याने हायक्रॉस खरेदी करण्याकडे लोकांचा सकारात्मक प्रतिसाद दिसण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊयात इनोव्हा हायक्रॉसमध्ये असलेल्या खास पाच वैशिष्ट्यांबद्दल.
हायब्रिड पॉवरट्रेन
इनोव्हा हायक्रॉसच्या रिकाम्या डिझेल इंजिनमध्ये कार्यक्षमता असलेला हायब्रिड पॉवर ट्रेन लाईनअप करण्यात आला आहे. 2.0 लिटरचे मजबूत हायब्रिड पेट्रोल इंजिनचे विकल्पही देण्यात आले आहेत. यामध्ये अॅटकिन्सन सायकलचा समावेश केला असून 184 hp पर्यंत त्याची क्षमता आहे. 2.0 लिटर पेट्रोल इंजिन असल्याने 172 Hp आणि 205 Nm पिक पॉवर असल्याने या कारला अधिक गती प्राप्त होते. या दोन्ही इंजिनमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिलं आहे आणि यात मॅन्यूअलचा विकल्प दिलेला नाहीय.
ADAS
टोयोटा सेफ्टी सेन्स ADAS पॅकेजही या हायक्रॉस कारमध्ये देण्यात आला आहे. लेप किप असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रुझ कंट्रोल, ऑटोमॅटिक हाय बीम आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक अर्लट यांसारखे भन्नाट फिचर्सचाही या कारमध्ये समावेश करण्यात आला आहे. या फिचर्समुळं MPV ची सुरक्षित कौशल्य वाढवण्यात मदत होते.
9 स्पिकर JBL साउंड सिस्टिम
इनोव्हा हायक्रॉसमध्ये आकर्षक अशी जेबीएलचे 9 स्पिकरचे ऑडीओ सिस्टिम देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना गाणी ऐकणाची प्रचंड आवड आहे, त्यांना या फिचरमुळं गाणी ऐकण्याचा आनंद लुटता येणार आहे.
पॅनोरमिक सनरुफ
भारतात कार खरेदी करणाऱ्यांसाठी कारमध्ये सनरुफची सुविधा असणे, अत्यंत महत्वाचं असतं. याच पार्श्वभूमीवर टोयोटा कंपनीने मोठा पॅनोरमिक सरनरुफची सुविधा या हायक्रॉस कारमध्ये दिली आहे. या फिचरमुळं कारमध्ये प्रवास करणाऱ्यांना लक्झरी अनुभव घेता येणार आहे.