अलिकडच्या वर्षांत परवडणारी किंमत आणि प्रदूषणा न करणाऱ्या मोठ्या रेंजच्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी देशात झपाट्याने वाढली आहे. परंतु अनेकदा असं दिसून आलं आहे की, इलेक्ट्रिक स्कूटर घेतल्यानंतर त्या स्कूटरच्या रेंज आणि बॅटरी बॅकअपबद्दल लोकांची खूप निराशा होत असते.

जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर येथे त्या महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या. या गोष्टी लक्षात ठेवून की तुम्ही स्कूटर खरेदी केल्यास तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिकमधून मोठ्या रेंजच्या आणि चांगला बॅटरी बॅकअप देणाऱ्या स्कूटर घेणं सोपं होईल.

किंमत: कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी तुम्ही तुमचे बजेट निश्चित केले पाहिजे. बजेट निश्चित केल्यानंतर, तुम्हाला बाजारात जास्त फिरावे लागणार नाही कारण तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर किती किंमतीपर्यंत खरेदी करायची आहे हे समजेल. बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ३०,००० ते १.५ लाख रुपयांपर्यंत आहे.

आणखी वाचा : Best Selling Electric Scooter Brands : या आहे जूनच्या टॉप 3 बेस्ट सेलिंग स्कूटर

गरज: बजेट तयार केल्यानंतर तुम्ही कोणत्या गरजेसाठी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत आहात ते पाहा. जर तुम्हाला घरगुती कामासाठी किंवा तुमच्या ऑफिसला जाण्यासाठी स्कूटर घ्यायची असेल, तर ऑफिस आणि घरातील अंतर लक्षात घेऊन त्या रेंजची स्कूटर खरेदी करा.

नेमकी गरज जाणून घेतल्यास, तुम्ही योग्य रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकाल आणि तुम्हाला वाटेत बॅटरी संपण्याची भीती वाटणार नाही.

रेंज: इलेक्ट्रिक स्कूटरमधील रेंज म्हणजे ती एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर किती किलोमीटर चालते. स्कूटर खरेदी करताना, लक्षात ठेवा की कंपनी स्कूटरच्या रेंजवर दावा करत आहे ते ARAI प्रमाणित आहे किंवा नाही.
रेंज प्रमाणित असेल तरच ती स्कूटर खरेदी करण्याची योजना करा. यासोबतच कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन या स्कूटरचे रिव्ह्यू वाचा आणि जर ती स्कूटर कोणाकडे असेल तर त्याच्या खऱ्या रेंजबद्दल नक्की जाणून घ्या.

आणखी वाचा : २ लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतेय Hyundai i20, जाणून घ्या ऑफर

बॅटरी: स्कूटरची रेंज त्यामध्ये प्रदान केलेल्या बॅटरी पॅकवर आधारित आहे. कारण बॅटरी स्वतः इलेक्ट्रिक स्कूटरचा मुख्य भाग आहे. स्कूटर विकत घेताना त्यामध्ये दिलेल्या बॅटरीची क्षमता आणि इलेक्ट्रिक मोटरची ताकद याची माहिती नक्कीच घ्या.
तसेच कंपनी या बॅटरीवर कोणती गॅरंटी आणि वॉरंटी योजना देत आहे ते जाणून घ्या जेणेकरून बॅटरी खराब झाल्यास तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

सर्व्हिस: कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी, त्याची सर्व्हिस लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात सर्व्हिसची चिंता करावी लागणार नाही. त्यामुळे त्या इलेक्ट्रिक स्कूटरला प्राधान्य द्या, ज्यावर कंपनी आपल्या सर्व्हिसींग प्लॅन देते.

यासोबतच त्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेवेसाठी कंपनीने दिलेली गॅरेंट आणि वॉरंटी अटीही नीट समजून घ्याव्या लागतील.

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी वर नमूद केलेल्या टिप्स लक्षात घेऊन, जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली तर तुम्हाला भविष्यात त्याची सर्व्हिसींग, रेंज किंवा इतर सेवांबाबत कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा खर्चाचा सामना करावा लागणार नाही.

Story img Loader